सात वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून खून

Last Updated: Monday, July 30, 2012, 16:10

मुलींवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. सातवर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे.

वाघुर पाणी घोटाळा : गुलाबराव देवकरही अडचणीत

Last Updated: Sunday, July 29, 2012, 20:51

जळगावमध्ये घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर पाणी योजना घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्यात सुरेश जैन यांच्या पाठोपाठ परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकरही गोत्यात आलेत. दोघांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.

नाशिक पोलिसांचं मिशन... 'ऑल आऊट'

Last Updated: Sunday, July 29, 2012, 14:56

शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलीस शुक्रवारी पुन्हा एकदा अचानक रस्त्यावर उतरले. या मिशनअंतर्गत ४२४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. तर १९२९ वाहनांची तपासणी करण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन वर्गणी उकळणाऱ्यांवर तक्रारी करण्याचं आवाहन केलं.

गोदावरीला नवं संरक्षण, पण थांबणार कधी प्रदूषण?

Last Updated: Friday, July 27, 2012, 23:57

गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे खाजगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल, असा संशय व्यक्त होतोय. पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय.

बस चालकांची गुर्मी; विद्यार्थी करतायत भरपाई

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:31

विद्यार्थ्यांची ही तोबा गर्दी.... बस थांब्यावर न थांबता सुसाट धावणाऱ्या बस... बसमागे दप्तराचं ओझं सांभाळत धावणारे विद्यार्थी... नाशिकमध्ये कुठल्याही बसस्टॉपवर दिसणारं हे दृश्यं... चालक बसस्टॉपच्या आधी तरी बस थांबवतो किंवा नंतर तरी... पण बस स्टॉपच्या ठिकाणी बस कधीच थांबत नाही...

एका गावाचे सतराशे साठ नवरे!

Last Updated: Thursday, July 19, 2012, 09:17

त्रिंबकेश्वर नगरपालिकेत लोकशाहीची थट्टा सुरू आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल पंधरा नगराध्यक्ष शहराच्या नशिबी आलेत. महाप्रसादाप्रमाणे नगरसेवकांना नगराध्यक्ष पद दिलं जात आहे.

कोर्टाच्या आदेशांना दाखवला 'भंगार बाजार'

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 09:37

अंबड सातपूर लिंक रोडवरचा भंगार बाजार हटविण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. हायकोर्टानं बाजार हटविण्याचे आदेश दिलेत तरिही महापालिका प्रशासन पावलं उचलत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर हे काम करणार कधी? या मुद्यावरून महापालिका आणि पोलिसांमध्ये टोलवाटोलसवी सुरू आहे.

लैलाच्या फार्म हाउसवर आरोपीसह पोलीस

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 17:06

लैला खानच्या प्रकरणात सखोल तपासाच्या दृष्टीकोनातून मुंबई क्राइम ब्रांचची टीम इगतपुरीत दाखल झालीय. लैला खानच्या फार्म हाउसवर मुख्य आरोपी परवेझ टाकसह सर्व साक्षीदार आणण्यात आलेत.

'पल्स पोलिओ'त भ्रष्टाचार, कधी घडणार 'साक्षात्कार'?

Last Updated: Sunday, July 15, 2012, 16:31

धुळे जिल्ह्यात NRHM योजनेत निकृष्ट दर्जोचे साहित्य खरेदी करुन आणि त्याचं बनावट बिल बनवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. यासंदर्भात वर्षभरानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीतील सदस्य आणि त्यांचा कारभार पाहता हा चौकशीचा फार्स आहे का अशी शंका उपस्थित होते.

युवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा

Last Updated: Sunday, July 15, 2012, 12:58

नाशिक जिल्ह्यातल्या बाडगी शासकीय आश्रमशाळेतल्या गर्भवती विद्यार्थिनी प्रकरणात हेमराज चौधरी या युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हेमराजला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.