`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर

`सागवान` तस्करीसाठी रूग्णवाहिकेचा वापर

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 09:43

महागड्या सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी चक्क आरोग्यविभागाच्या रूग्णवाहिकेचा वापर केल्याची धक्कादायकबाब उघड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाल हादरले आहे.

भुजबळांच्या उमेदवारीला विरोध, मनमाडमध्ये रास्तारोको

भुजबळांच्या उमेदवारीला विरोध, मनमाडमध्ये रास्तारोको

Last Updated: Saturday, March 1, 2014, 17:51

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. आज येवला बंदची हाक देण्यात आलीये. मनमाड-नगर रस्त्यावर रास्तारोको करण्यात आलाय. भुजबळांच्या उमेदवारीला विरोध होतोय.

छगन भुजबळांचा शरद पवारांनी केला गेम!

Last Updated: Saturday, March 1, 2014, 11:17

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी त्यांचा गेम केल्याची खमंग चर्चा रंगलीय. अनेक दिग्गज मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असं आधी पवारांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात एकट्या भुजबळांनाच लोकसभेवर पाठवून पुतणे अजित पवारांचं वर्चस्व वाढवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे की काय, असं बोललं जातंय. त्यामुळं भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय.

नाशिकमध्ये सलमान, सुनील शेट्टीची बोट सफर

नाशिकमध्ये सलमान, सुनील शेट्टीची बोट सफर

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 23:14

आगामी लोकसभा निवडणुका एका एक दिवस जवळ येत असल्यानं भूमिपूजन आणि उद्घाटनांची मालिकाच सध्या सुरु आहे.

शिक्षकांकडून विद्यार्थीनींची छेड, जाब विचारल्याने रोखले पिस्तुल

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 15:19

शाळेतले दोघे शिक्षक मुलींची छेड काढतात या आरोपावरून चेअरमनला जाब विचारायला गेलेल्या पालकांवर संस्थाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याची खळबळजनक घटना घडलीय.

बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार वाघ पुन्हा अडचणीत

बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार वाघ पुन्हा अडचणीत

Last Updated: Monday, February 24, 2014, 23:49

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदार संघाचे आमदार दिलीप वाघ हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले

दहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले

Last Updated: Sunday, February 23, 2014, 18:39

संकेत आणि मुज्जफर. शनिवारी सकाळी दहावीच्या निरोप समारंभसाठी आनंदात संकेत आणि मुझफ्फर निघाले. हसतखेळत जात असताना त्रिमूर्ती चौकात त्यांना एका मोपेडचा धक्का लागला. ट्रकखाली चिरडलं गेल्यानं दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलीस चौकी असूनही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी कधीही पोलीस नसतात. दरम्यान, परभणीतील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला.

राज ठाकरे-नितीन गडकरींनी केले एकमेकांचे कौतुक

राज ठाकरे-नितीन गडकरींनी केले एकमेकांचे कौतुक

Last Updated: Saturday, February 22, 2014, 16:13

नाशिकमधल्या गोदापार्कच्या भूमिपूजनात राज ठाकरे आणि नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं.

नितिन गडकरी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

नितिन गडकरी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

Last Updated: Saturday, February 22, 2014, 12:58

नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागणारे राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आज नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

प्रशांत दामलेंकडून नाशिक पालिकेच्या कारभाराचे वाभाडे

प्रशांत दामलेंकडून नाशिक पालिकेच्या कारभाराचे वाभाडे

Last Updated: Friday, February 21, 2014, 20:20

प्रशांत दामलेंचा नाशिकमध्ये प्राध्यापक वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मात्र या जाहीर कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी नाशिक महापालिकेच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले.