पुणे महापालिकेला रुग्णालयांचा ठेंगाच

पुणे महापालिकेला रुग्णालयांचा ठेंगाच

Last Updated: Thursday, December 19, 2013, 21:03

रुग्णसेवा करतात म्हणून महापालिकेनं खासगी रुग्णालयांना एफएसआयची खैरात वाटली… करांमध्येही सवलत दिली. बदल्यात या हॉस्पिटल्सनी महापालिकेनं सूचवलेल्या गरीब रुग्णांवर मोफत उपचार करायचे होते. प्रत्यक्षात मात्र या रुग्णालयांनी महापालिकेला फक्त ठेंगाच दाखवलाय.…

पुण्यात नवऱ्याने बायकोला पेटवून दिले

Last Updated: Thursday, December 19, 2013, 20:51

बायकोशी झालेल्या वादातून तिला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या मंडई भागात घडलीये… या महिलेचा पती आरोपी शंकर जोगदंड याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केलीय.

पुणे ते कन्याकुमारी मुलींची सायकल रॅली

Last Updated: Thursday, December 19, 2013, 20:25

१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५१ वी जयंती साजरी केली जातेय. आणि याच दिवशी स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनी पुणे ते कन्याकुमारी हा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या मुलींची ही प्रॅक्टिस पाहून एखाद्या सायतलिंग स्पर्धेची तयारी सुरू आहे, असंच वाटेल. मात्र ही तयारी कुठल्याही स्पर्धेची नाही.

राज्यात पुन्हा दूध २ रूपयांनी महागले

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 21:03

महिन्याभरात दुधाच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दुधात लीटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ही दरवाढ लागू असेल असं दूध उत्पादक संघानं स्पष्ट केल आहे.

लोकपाल विधेयक : अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 14:03

राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.

घरफोड्या करणारी नवरा-बायकोची जोडी जेरबंद

घरफोड्या करणारी नवरा-बायकोची जोडी जेरबंद

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 21:02

घरफोड्या करणारी नवरा बायकोची जोडी पुणे पोलिसांनी जेरबंद केलीय. घर फोडी करण्याची हाफ सेंच्युरी या जोडप्यानं पूर्ण केलीय. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या ही जोडी घरफोड्या करायची. पाहुयात बंटी आणि बबलीचा हा कारनामा...

बारामतीत १४ वर्षीय मुलीनं बलात्कार झाल्यानं स्वत:ला पेटवलं

बारामतीत १४ वर्षीय मुलीनं बलात्कार झाल्यानं स्वत:ला पेटवलं

Last Updated: Monday, December 16, 2013, 20:40

दिल्लीत सामूहिक बलात्काराला एक वर्ष पूर्ण होत असतानाच बारामतीमध्ये धक्कादायक घटना समोर आलीय. चौदा वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केलाय.

पिंपरी-चिंचवडमध्ये आठवड्याला एक बलात्कार!

पिंपरी-चिंचवडमध्ये आठवड्याला एक बलात्कार!

Last Updated: Monday, December 16, 2013, 19:35

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालं. देशात इतकी भयानक घटना घडल्यानंतरही वर्षभरात चित्र काही बदललं नाही. महत्त्वाच्या शहरांमधली बलात्काराची आकडेवारी पाहिली, तर हे लक्षात येतं.

<b><font color=red>अहमदनगर : </font></b> सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांकडे

अहमदनगर : सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांकडे

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 07:43

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज झालेल्या मतमोजणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांच्या हाती आल्या आहेत.

धुळे, अहमदनगर पालिकेसाठी मतदान सुरू...

Last Updated: Sunday, December 15, 2013, 11:14

धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी मतदान सुरु झालंय.