इअर एंडला मिळणार शिळं मटण

इअर एंडला मिळणार शिळं मटण

Last Updated: Saturday, December 28, 2013, 00:06

३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरच्या खवय्ये नागरीकांना चिंतेत टाकणारी एक बातमी....कोल्हापूर महानगरपालीकेनं आधुनिक कत्तलखाना बी.ओ.टी तत्वावर उभारण्याच निर्णय घेतलाय.

`दारुभट्‍टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का?`

Last Updated: Friday, December 27, 2013, 13:35

पुण्यातील दारुभट्‍टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का?, असे खडेबोल उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलिसांना सुनावले. अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता पुण्‍यातील फुरसुंगी कचरा डेपोला भेट दिली. त्यावेळी कचराडेपोजवळ दारूभट्टी सुरू असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर पवारांचा पाराच चढला. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी चांगलेच झापले.

आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा - अजित पवार

Last Updated: Thursday, December 26, 2013, 13:36

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या अहवालावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय़ मुख्यमंत्र्यांचा होता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.

कोणी उडवलेय पुणेकरांची झोप?

कोणी उडवलेय पुणेकरांची झोप?

Last Updated: Thursday, December 26, 2013, 09:34

पुण्यामध्ये सध्या एकट्या दुकट्यानं रस्त्यावर चालणं धोक्याचं झालंय. पुण्यातली चाळीस हजारी टोळी रस्त्यावर गाठते आणि हल्ले करते. या टोळीनं पुणेकरांची झोप उडवलीय.

शिक्षक पत्नीला विद्यार्थ्यांने केला फोन आणि प्राचार्यांची सटकली

शिक्षक पत्नीला विद्यार्थ्यांने केला फोन आणि प्राचार्यांची सटकली

Last Updated: Thursday, December 26, 2013, 09:26

धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगांव इथली. गोकुळ शिरगांव इथल्या आंबुबाई पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल अॅन्ड सायन्स कॉलेजच्या प्राचार्यानी बाराबीत शिकाणाऱ्या विदयार्थाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शिक्षक पत्नीला फोन करण्याच्या कारणावरून ही मारहाण केल्याचे सांगितलं जात आहे.

केवळ अडीच तासांत... एकाच ठिकाणी... १८ घरफोड्या!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 20:14

पुण्याच्या उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. या परिसरात एकाच दिवशी दिवसा ढवळ्या १८ घरफोड्या झाल्यायत.

‘पक्षातल्याच लोकांनी गळा कापला’; मिलिंद पाटणकर ‘झी २४ तास’वर...

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 18:39

गेले दोन दिवस गायब असलेले ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर आज सर्वप्रथम `झी २४ तास`वर अवतरले. आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसून चार दिवस विश्रांतीसाठी म्हणून आपण बाहेर फिरायला गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

गृहमंत्र्यांच्या गावात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक

गृहमंत्र्यांच्या गावात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 12:56

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघातून दहशतवाद्यांना मदत करणा-या दोघांना अटक करण्यात आलीय.. एटीएस, महाराष्ट्र एटीएस आणि सोलापूर क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलीय.. या आरोपींकडून स्फोटंकं आणि पिस्तुल जप्त करण्यात आलीत.

मी ‘अक्षर’ बोलतोय...

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 23:57

ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांचं `अक्षर` हे पुण्यातील राहतं घर पुनर्विकासासाठी लवकरच तोडलं जाणार आहे. मात्र, माडगुळकरांच्या स्मृती जपण्यासाठी या वास्तूमध्ये विशेष जागा ठेवण्यात येणार आहे. शिवाय या वास्तूचं नावही बदललं जाणार नाहीय. माडगुळकर आणि `अक्षर` यांचं विशेष नातं सांगणारा हा खास रिपोर्ट...

‘जागो ग्राहक जागो’... बिल्डरपासून सावधान!

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 21:32

आज राष्ट्रीय ग्राहक दिन... त्यानिमित्तानं ग्राहकांची सर्वाधिक फसवणूक कोण करतं, हे आम्ही जाणून घेतलंय. पुण्यात यामध्ये सगळ्यात वरचा क्रमांक पटकावलाय बिल्डर्सनी...