मराठी अभिनेत्रीला फसवून केले काँग्रेस नेत्याने लग्न

Last Updated: Saturday, June 29, 2013, 16:01

मंत्रालयात झालेल्या ओळखीतून पनवेलच्या नगरसेवकाने फसवून लग्न केल्याची तक्रार एका मराठी अभिनेत्रीने पुणे पोलिसांच्या महिला सहाय्यता कक्षात दिली आहे. या नगरसेवकाने पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवून तिच्याशी लग्न केल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

देहूनगरीत वारकरी मेळा, तुकोबांच्या नामाचा गजर

Last Updated: Saturday, June 29, 2013, 15:40

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं. मुख्य मंदिरातून दुपारी २ वाजता तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर तुकोबारायांची पालखी इनामदारवाड्यात पोहचेल आणि इथंच पालखीचा मुक्काम असेल.

उंदराने घातला दरोडा!

Last Updated: Saturday, June 29, 2013, 07:25

चोरीची रक्कम फक्त साडेचार हजार रुपये असली तरी ही रक्कम पळविणारा कोणी सराईत चोरटा नाही. तर तो आहे उंदीर मामा…

मी पुण्याची `....`

Last Updated: Friday, June 28, 2013, 21:41

उत्तम आरोग्यासाठी पुण्याची हवा चांगली. पुण्यातलं वातावरण प्रकृतीसाठी चांगलं ही वाक्यं आपण सगळेच गेली कित्येक वर्षं ऐकतोय. पुण्याला हा नावलौकिक मिळाला तो तिथल्या हिरव्यागार टेकड्यांमुळे पण आता हा इतिहास झालाय... पुण्याची फुफुस्सं मानली जाणा-या टेकड्यांवर पुणेकर घाव घालू लागलेत

सिरियल किलरकडून आणखी एका खुनाची कबुली

Last Updated: Thursday, June 27, 2013, 23:55

कोल्हापुरातल्या सीरियल किलिंग प्रकरणात अटकेत असलेल्या दिलीप लहरियानं आणखी एक खून केल्याची कबुली पोलिसांना दिलीय.

खोटे सोने तारण ठेऊन बँकेलाच गंडवले!

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 19:45

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर आणि टेंभूर्णी शाखेला बनावट सोनं तारण ठेवून गंडवल्याचं समोर आल्यानं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडालीय. बँकेच्या सराफानंच बँकेला गंडवलंय.

पुणे विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस!

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 19:41

पुणे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडलाय. या हरकती नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज अखेरपर्यंत सुमारे ५० हजारांवर हरकती दाखल करून पुणेकरांनी शहर बकाल होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय.

राष्ट्रवादीला उदयनराजेंची अॅलर्जी, महापौरांनी काढला पळ!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 07:24

राष्ट्रवादी काँग्रेसला उदयनराजे भोसले यांची किती ऍलर्जी आहे... याचं उदाहरण पुणे महापालिकेत समोर आलंय... त्याचबरोबर उदयनराजे यांच्याविषयी बोलायला राष्ट्रवादीचे पदाधिकारी कसे घाबरतात हेसुद्धा पहायला मिळालं. एका पेन्टिंगवरुन हा सगळा गोंधळ झालाय.....

राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं आव्हान

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 15:46

मनसे प्रमुख राज ठाकरेंना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलं आहे.

विठूचा गजर, वारकऱ्यांचा `डीजे`!

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 21:24

काळाच्या पावलांबरोबर वारी आधुनिक होतेय. निवृत्तीनाथांच्या पालखीत हे बदललेलं चित्र पहायला मिळालं. निवृत्तीनाथांच्या पालखीत चक्क डीजे लावण्यात आला होता. विठ्ठलाच्या गाण्यावर आणि डीजेच्या तालावर वारकरी नाचत होते.