मी शिवसेना सोडणार नाही - खासदार वाकचौरे

मी शिवसेना सोडणार नाही - खासदार वाकचौरे

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 20:12

शिवसेना सोडून आपण काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्ट केलंय. शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे, अशी चर्चा होती.

पिंपरीत तलवारी घेवून नंगा नाच, १९ जण ताब्यात

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 19:14

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये कायदा सुव्यस्था आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून ५० ते ६० जणांच्या तरुणांनी थेरगाव मध्ये क्रांतीनगर परिसरात तलवारी घेवून नंगा नाच केला. अनेक वाहनांची तोड फोड केली. महिलांनाही मारहाण कऱण्यात आलेय. या प्रकरणी पोलिसांनी १९ जणांना ताब्यात घेतलंय.

कसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?

कसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 19:35

शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे.

राज यांच्या पुण्यातील सभेला `दंडुकेशाही`चा अडथळा

राज यांच्या पुण्यातील सभेला `दंडुकेशाही`चा अडथळा

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 15:17

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील ९ फेब्रुवारीच्या सभेला परवानगी देण्यासाठी पोलीस अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप पुण्यातल्या मनसे नेत्यांनी केलाय.

बस - कार - कंटेनर - टेम्पोला अपघात, १० ठार

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 12:24

सातारा - पुणे रस्त्यावर एक विचित्र अपघात झालाय. एका गाडीला झालेल्या अपघातामुळे मागच्या गाड्यांनीह एकमेकांना धडक दिली आणि अपघातात तब्बल १० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर ३६ हून अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन पुरूष आणि सात महिलांचा समावेश आहे.

नवऱ्यानंच करवला पत्नीवर सामूहिक बलात्कार

नवऱ्यानंच करवला पत्नीवर सामूहिक बलात्कार

Last Updated: Monday, February 3, 2014, 22:26

निफाड सामूहिक बलात्कार प्रकरणी धक्कादायक बातमी आहे... याप्रकरणी हत्या झालेल्या महिलेचा पती भारत यालाच अटक करण्यात आलीय. महिलेच्या पतीनंच साथीदारांकरवी हल्ल्याचा बनाव केला आणि त्या महिलेला ठार मारलं.

धक्कादायक: अभ्यासच जीवावर बेतला

धक्कादायक: अभ्यासच जीवावर बेतला

Last Updated: Monday, February 3, 2014, 21:57

अभ्यास करणंही जिवावर बेतू शकतं हे औरंगाबादच्या एका घटनेवरून सिद्ध झालय. अभ्यास करत नसल्याची तक्रार केली म्हणून मावस भावानंच मावस भावाचा खून केल्याचं औरंगाबादेत समोर आलंय. या खूनाच्या प्रकरणानं औरंगाबाद हादरलय.. किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळणार?

निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळणार?

Last Updated: Monday, February 3, 2014, 21:37

आगामी लोकसभा आणि त्याच्या पाठोपाठ नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मराठा समाजास शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये २५ टक्के आरक्षणाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

येडा अन्ना, कतरीना आणि अमिताभ... एकत्र!

Last Updated: Monday, February 3, 2014, 18:27

शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अन्ना, गब्बर, अमिताभ, माया... ही नावं आहेत ताडोबा अंधारी  प्रकल्पातील वाघ-वाघिणींची...

नितीन गडकरी यांचा केजरीवाल यांना टोला

नितीन गडकरी यांचा केजरीवाल यांना टोला

Last Updated: Monday, February 3, 2014, 10:26

मला निवडणूक जिंकण्यासाठी मीडियाची गरज नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.