पुणे इंजिनिअर हत्याकांड : गृह मंत्रालयानं मागवला अहवाल

Last Updated: Friday, June 6, 2014, 14:12

पुण्यामध्ये फेसबुक प्रकरणातून एकाचा खून झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल केंद्रानं राज्याकडून मागवलाय, पुण्यात फेसबुक प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटलेत.

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव

Last Updated: Thursday, June 5, 2014, 19:54

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.

दत्ता मेघे अखेर भाजपच्या वाटेवर

दत्ता मेघे अखेर भाजपच्या वाटेवर

Last Updated: Thursday, June 5, 2014, 18:29

काँग्रेसचे दत्ता मेघे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत आहे.

फेसबुक प्रकरणातून इंजिनिअर तरुणाची हत्या

Last Updated: Thursday, June 5, 2014, 11:00

पुण्यातील एका हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत असणाऱ्या काही जणांनी 28 वर्षांच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला लाठ्या – काठ्यांनी इतकी जबर मारहाण केली की त्यामध्ये या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

`लाचखोर` चिखलीकरवर 1000 पानांचं आरोपपत्र दाखल

Last Updated: Thursday, June 5, 2014, 09:55

सार्वजनिक बांधकाम विअभागाचे लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक कोर्टात तब्बल हजार पानांच आरोप पत्र दाखल केलंय.

महिला कंडक्टर आणि प्रवासी महिलेचे कपडे फाडले

महिला कंडक्टर आणि प्रवासी महिलेचे कपडे फाडले

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 21:08

कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस मध्ये क्षुल्लक वादातून एका प्रवाशाने महिला कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. इतकेच नव्हे सदर पीडीत महिलेची मदत करण्यास गेलेल्या दुसऱ्या महिला कंडक्टरलाला या माथेफिरू प्रवाशाने बेदम मारहाण केली.

परळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे

परळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 21:57

गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्यावेळी जी दगडफेक झाली ती मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. असे त्यांचे कार्यकर्ते नाही. दगडफेक करणारे मुंडे साहेबांचे समर्थक नाहीत, दगफेकीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्यांचे वाढविले थांबे

कोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्यांचे वाढविले थांबे

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 17:49

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. कोकण रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही मेल आणि काही एक्स्प्रेसच्या थांब्यात वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबे देण्यात आले आहेत.

मुंडे गेले, ही भावना सहन न झाल्याने तणाव - पंकजा मुंडे

मुंडे गेले, ही भावना सहन न झाल्याने तणाव - पंकजा मुंडे

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 17:35

आपला नेता गेला, यावर संपूर्ण महाराष्ट्राचा काय तर माझाही विश्वास बसत नाहीय, असं गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी – उद्धव ठाकरे

मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी – उद्धव ठाकरे

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 16:36

लोकांच्या भावना लक्षात घ्या असं म्हणत या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परळी येथे केली आहे. परळीत गोपीनाथ मुंडेच्या अंत्यविधीसाठी उद्धव ठाकरे आले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.