फसवणुकीचा फटका... बँकेचीच तिजोरी रिकामी

Last Updated: Sunday, January 12, 2014, 22:44

नाशिकच्या प्रथितयश आणि आर्थिक संपन्न असलेल्या नामको बँकेच्या संचालकांची मनमानी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला खरा मात्र नाशिकारांनी धसका घेत सर्व बँकेतील रकमा काढून डबघाईला आणली आहे.

भावा-बहिणीत अनैतिक संबंध, प्रियकराची आत्महत्या

Last Updated: Sunday, January 12, 2014, 19:04

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका मानलेल्या भावानं आत्महत्या केलीय.

टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ आणि तोडफोड

टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ आणि तोडफोड

Last Updated: Sunday, January 12, 2014, 15:23

कोल्हापूर टोल प्रश्न आता चांगलाच चिघळलाय. टोलविरोधी आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची आज शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय. टोल नाके पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय.

मंत्र्यांचं आश्वासन ठरलं फोल, कोल्हापुरात ‘टोल’फोड!

मंत्र्यांचं आश्वासन ठरलं फोल, कोल्हापुरात ‘टोल’फोड!

Last Updated: Sunday, January 12, 2014, 12:46

कोल्हापूरात सुरु असलेले टोल नाके शनिवारी मध्यरात्रीपासून बंद होतील, असं आश्वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिल्यानंतर टोल विरोधी कृती समीतीच्या सदस्यांनी आमरण उपोषण मागं घेतलं. पण यानंतर सुद्धा कोल्हापूरातील अनेक टोल नाक्यावर आय.आर.बी कंपनीच्यावतीनं टोल वसुली सुरु आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांच्यातून संताप व्यक्त होतोय. टोलवसुली सुरु असल्यानं शिवसैनिकांनी फुलेवाडीचा टोलनाका फोडला आहे.

नांदेडमध्ये हॉरर किलिंग, उशीनं तोंड दाबून केली मुलीची हत्या

नांदेडमध्ये हॉरर किलिंग, उशीनं तोंड दाबून केली मुलीची हत्या

Last Updated: Sunday, January 12, 2014, 09:22

नांदेडमध्ये हॉरर किलिंगचा प्रकार उघड झालाय. आई वडिलांनीच लेकीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या मुलीचं एका तरुणावर प्रेम होतं. मात्र तिच्या आईवडिलांचा या प्रेमाला विरोध होता. याच विरोधातून या दोघांनी तिची हत्या केली. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना अटक केलीय.

सुशीलकुमार शिंदे खोटे बोललेत..दाऊदला आणणे अशक्य

सुशीलकुमार शिंदे खोटे बोललेत..दाऊदला आणणे अशक्य

Last Updated: Saturday, January 11, 2014, 23:17

मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणणं शक्य नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीय. ते सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे दाऊदला भारतात घेऊन येणं शक्य नसल्याचं शिंदे म्हणालेत. यावरून दाऊदला भारतात आणणार असल्याच त्यांनी याआधी केलेलं विधान खोटं असल्याचं स्पष्ट झालंय.

नाशिकच्या कारभारावर राज ठाकरे चिडलेत, विरोधात बसा

Last Updated: Saturday, January 11, 2014, 23:08

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौ-यानंतर महापौर बदलणार या चर्चेला उधाण आलंय. नगरसेवकांच्या बैठकीमध्ये राज यांनी महापालिकेच्या कारभारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. सत्तेत बसून काम करु शकत नसेल तर विरोधात बसलेलं कधीही चांगलं असं सुनावून राज बैठकीतून उठून गेलेत.

कोल्हापूर टोलविरोधी आंदोलनाची तलवार म्यान

कोल्हापूर टोलविरोधी आंदोलनाची तलवार म्यान

Last Updated: Saturday, January 11, 2014, 22:36

कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कामगारमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची तलवार म्यान झाली. कोल्हापूरकरांना टोलमुक्ती मिळणार का याकडं आता नजरा लागल्या आहेत.

शरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही सुशीलकुमार शिंदेंची इच्छा

शरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही सुशीलकुमार शिंदेंची इच्छा

Last Updated: Saturday, January 11, 2014, 16:34

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

राज ठाकरेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार, युती तोडा - भाजप

Last Updated: Friday, January 10, 2014, 18:41

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींवरील विधानानंतर नाशिक मनपातील सत्ताधारी मनसे आणि भाजपमध्ये कटूता वाढलीये. उद्या होणा-या भूमिपूजन आणि विकास कामांच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकलाय. दरम्यान, मनसेबरोबरची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.