कोल्हापुरात अस्वस्थता वाढतेय, टोलविरोधी आंदोलनाला धार

Last Updated: Friday, January 10, 2014, 18:01

कोल्हापुरातील टोल विरोधातील आंदोलन काही थांबताना दिसत नाही. आज टोल विरोधातील आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकाळी कोल्हापूर महापालीकेला टेम्पोधारक संघटनेनं घेराव घातला. या आंदोलनामुळे कोल्हापूर महापालीका परिसरात वाहातुकीची मोठी कोंडी झाली होती.

दाजीकाका गाडगीळ यांचे पुण्यात निधन

दाजीकाका गाडगीळ यांचे पुण्यात निधन

Last Updated: Friday, January 10, 2014, 15:02

पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, शंभरीतही तरुणाईला लाजवणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचे शुक्रवारी पुण्यात प्रयाग रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 99 वर्षाचे होते.

बुलढाणा: अपघातात ५ विद्यार्थीनी ठार

बुलढाणा: अपघातात ५ विद्यार्थीनी ठार

Last Updated: Friday, January 10, 2014, 14:47

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहुलगाव फाटयाजवळ काटी या गावावारून मलकापूरला येत असलेल्या बसला समोरून येणा-या ट्रकनं चिरडलंय. या भीषण अपघातात ५ विद्यार्थिनी जागीच ठार झाल्यायत. तर 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत. सकाळी सात वाजता हा अपघात झालाय.

हप्ता मागणाऱ्या गुंडाना चोप, एकाचा मृत्यू

हप्ता मागणाऱ्या गुंडाना चोप, एकाचा मृत्यू

Last Updated: Friday, January 10, 2014, 13:59

रत्नागिरीतल्या खाऊ गल्लीत विक्रेत्यांकडे हप्ता मागायला गेलेल्या दोन गुंडांना विक्रेत्यांनी चोप दिलेला वासीन मोमीन उर्फ उंड्याचा मृत्यू झालाय... .

‘आप्पासाहेब धर्माधिकारी’नी आम्हाला मार्गदर्शन करावे- उद्धव ठाकरे

Last Updated: Friday, January 10, 2014, 13:48

महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री सदस्य परिवाराचे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांचा गौरव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आप्पासाहेबांचा नागरी सत्कार करुन आणि सचिनदादांना रायगड भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके

पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके

Last Updated: Thursday, January 9, 2014, 23:29

महिलांबरोबरच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनात दिवसोंदिवस वाढ होतेय. पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके दिल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शेजारऱ्यांनी माणुसकी दाखवत बाल कल्याण समितीची मदत घेऊन या लहानग्याची या त्रासातून सुटका केलीय.

रत्नागिरीत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रत्नागिरीत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Last Updated: Thursday, January 9, 2014, 17:20

रत्नागिरी तालुक्यात एक धक्कादायक आणि चिड आणणारी घटना घडली. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या पिडीत मुलीला मित्राच्या घरी नेऊन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्यांनी वाईट कृत्य केलं.

‘मोदींच्या प्रसिद्धीमुळं पोटात दुखतंय’ फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

‘मोदींच्या प्रसिद्धीमुळं पोटात दुखतंय’ फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Last Updated: Thursday, January 9, 2014, 13:52

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सातत्यानं कुठल्या एका प्रदेशाबद्दल बोलत नाहीत तर ते देशाबद्दल, देशाच्या विकासाबाबत बोलतात.

महाराष्ट्रात मनसेच ‘आप’चा बाप, राज ठाकरेंनी काढला चिमटा!

महाराष्ट्रात मनसेच ‘आप’चा बाप, राज ठाकरेंनी काढला चिमटा!

Last Updated: Thursday, January 9, 2014, 13:33

नवी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपचं अभिनंदन करतांना महाराष्ट्रात मात्र मनसेच ‘आप’चा बाप असल्याचं म्हटलंय. दिल्लीमध्ये काम न केल्याचा काँग्रेसला फटका बसला असंही राज ठाकरे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली मत मांडली.

नाशिकमध्ये काय म्हणाले राज ठाकरे !

नाशिकमध्ये काय म्हणाले राज ठाकरे !

Last Updated: Thursday, January 9, 2014, 13:53

महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत अग्रस्थानी, पण आलेख चढता हवा - राज ठाकरे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची माझी इच्छा आजही कायम - राज ठाकरे