राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा

राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा

Last Updated: Thursday, February 13, 2014, 08:22

टोल प्रश्नावर आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही मोजक्या संपादकांसह ही चर्चा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत टोलप्रश्नावर काय तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

भर कॅबिनेटमध्ये उडविली गेली राज ठाकरेंची खिल्ली...

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 20:49

राज ठाकरे यांच्या आंदोलनाला रस्त्यावर प्रतिसाद मिळाला नाहीच, दुसरीकडे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. उलटपक्षी मंत्रिमंडळ बैठकीत राज ठाकरे यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आली.

आंदोलन फसलं... 'चर्चा' तर होणारच!

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 18:54

टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुरू केलेलं रास्ता रोको आंदोलन अवघ्या ३६० मिनिटांत संपलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी चर्चेसाठी बोलावल्यानं, राज ठाकरेंनी ३६० अंशात यू टर्न घेत, आंदोलन मागे घेतलं. चर्चाच करायची होती, तर आजचं आंदोलन करून राज ठाकरेंनी काय साधलं? असा सवाल उपस्थित केला जातोय.

राज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 17:22

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.

काही पक्षांचे भान सुटत चालले- अजितदादांचा टोला

काही पक्षांचे भान सुटत चालले- अजितदादांचा टोला

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 16:22

काही राजकीय पक्षांचे भान सुटत चालले आहे... निवडणुका जवळ आल्यामुळं जनतेच्या प्रश्नांची जाणिव झाली असावी असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना मारला आहे...

आंदोलनासाठी हिंमत, धमक आणि चमक लागते-आव्हाड

आंदोलनासाठी हिंमत, धमक आणि चमक लागते-आव्हाड

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 14:38

राज ठाकरे यांच्या आंदोलनावर जीतेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी हिंमत, धमक आणि चमक लागते, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते जीतेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंची अखेर सुटका

राज ठाकरेंची अखेर सुटका

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 13:35

राज ठाकरे यांची उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यामुळे आरसीएफ पोलिस स्टेशनबाहेर आल्यानंतर राज काय बोलतील, यावर सर्वाचं लक्ष लागून आहे.

मनसे आंदोलन : राज यांच्यानंतर आणखी कोण अटकेत

मनसे आंदोलन : राज यांच्यानंतर आणखी कोण अटकेत

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 12:21

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शर्मिला ठाकरेंचा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या

शर्मिला ठाकरेंचा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 11:35

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चेंबूरमध्ये आरसीएफ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

महाराष्ट्र टोलमुक्त होणार नाही - भुजबळ

महाराष्ट्र टोलमुक्त होणार नाही - भुजबळ

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 11:21

मनसेचं टोल आंदोलन सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे.