घटस्फोटाचे कारण 'फेसबुक'

Last Updated: Sunday, January 1, 2012, 23:58

युनायटेड किंग्डममध्ये मागील वर्षात घटस्फोटांचे प्रमुख कारण फेसबूक असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरातील एक तृतियांश घटस्फोट फेसबूकमुळे झाले असं सांगण्यात येत आहे. तसंच घटस्फोटांच्या खटल्यांमध्ये फेसबूकचा पुरावा म्हणून उपयोग करण्यात येत आहे

बजाजची छोटी गाडी लवकरच

Last Updated: Monday, January 2, 2012, 13:47

टाटा नानोला टक्कर देण्यासाठी बजाज आपली पहिली नवी कार लवकरच लँच करणार आहे. बजाज आपल्या ८० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी किंमतीची चार चाकी बाजारात आणणार आहे. दिल्लीत सात जानेवारी पासून सुरू होणाऱ्या ऍटो एक्सपो मध्ये बजाज कंपनी ही कार लँच करणार आहे.

आला रे आला गुगलचा नवा स्मार्टफोन

Last Updated: Friday, December 30, 2011, 12:51

जगातल्या निवडक अठरा देशांमध्येच टेक्नोलॉजी जगतातली बलाढ्य कंपनी नवा स्मार्टफोन गॅलेक्सी नेक्सस लाँच करणार आहे आणि तो भारतातही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आयफोनला गारद करु शकण्याची ताकद या नव्या स्मार्टफोनमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पोर्श डिझाईनच्या स्मार्टफोनची नजाकत

Last Updated: Saturday, December 31, 2011, 08:51

रिसर्च इन मोशन या कंपनीने पोर्श डिझाईनच्या सहकार्याने ब्लॅकबेरी स्मार्टफोन पोर्श डिझाईन पी ९९८१ हे लेटेस्ट मॉडेल लँच केलं. पोर्श डिझाईने डिझाईन केलेला या स्मार्टफोनची लिमिटेड एडिशन उपलब्ध करुन देण्यात आली आहे

चेहरा वाचून खाद्यपदार्थ देणारं वेंडिंग मशीन

Last Updated: Thursday, December 29, 2011, 23:05

अमेरिकेत एका कंपनीने एक असं खाण्याचं वेंडिंग मशीन तयार केलं आहे की जे लोकांचा चेहरा वाचून त्याचं वय आणि लिंग याची ओळख पटवून त्यांना खाद्य पदार्थ द्यायचा कि नाही द्यायचा याचा निर्णय घेऊ शकतं.

'द न्यू यॉर्क टाईम्स'चा 'इ-मेल' घोटाळा

Last Updated: Thursday, December 29, 2011, 14:14

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र ‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या ८० लाख वर्गणीदारांना गुरूवारी अचानक ‘न्यू यॉर्क टाईम्स’ची वर्गणी रद्द करण्याचा बेत रद्द केल्यास आम्ही तुम्हाला डिस्काऊंट देऊ’ असं सांगणारा ‘न्यू यॉर्क टाईम्स’चा इ-मेल आला.

ब्लॅकबेरीचे प्लेबुक आता निम्म्या किंमतीत

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 23:05

ब्लॅकबेरी सिरीज फोनचे निर्माते रिसर्च इन मोशन म्हणजे रिमने प्लेबुकची किंमत निम्म्याहून कमी केली आहे. भारतात टॅबलेट पीसीला असलेली भरपूर मागणी लक्षात घेत कंपनीने 16 GBचा प्लेबुक १३,४९० रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे.

छोटा मायक्रोफोन पाहिलात कधी?

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 22:57

इराणच्या एका वैज्ञानिकाने जगातील सगळ्यात छोटा मायक्रोफोन बनविल्याचा दावा केला आहे. वैज्ञानिकाच्या मते याचा उपोयग कर्णबधिर असणाऱ्या लोकांना त्यांच्या यंत्रात या 'अदृश्य' मायक्रोफोनचा फायदा होईल.

आकाशचा नवा टॅब लवकरच बाजारात

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 19:38

आकाशचं बुकिंग न करु शकल्यामुळे जर तुम्ही निराश झाला असाल तर तुमच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल. आकाशची निर्मिती करणाऱ्या डाटाविंड कंपनीने युबीस्लेट 7+ ही नवी टॅबलेट लवकरच बाजारात लँच करण्याचं ठरवलं आहे. युबीस्लेट 7+ साधारणत: २९९९ रुपयांना उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. या आधीची आकाश युबीस्लेट 7 टॅब फक्त विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध होती पण ही नवी टॅब सर्वांसाठी आणि सर्वत्र मिळणार आहे.

'आकाशा'त परत भरारी मारण्याची संधी

Last Updated: Monday, December 26, 2011, 15:28

आकाश टॅबलेटचं बुकिंग करण्याची संधी ज्यांनी गमावली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. डाटाविंड कंपनीने १५ डिसेंबरला aakashtablet.com या संकेतस्थाळवर आकाशसाठी ऑनलाईन बुकिंगची सूविधा उपलब्ध करुन दिली होती. आता ज्यांना त्यावेळेस या संधीचा लाभ घेता आला नव्हता त्यांना NCarry.com. या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे.