लावाची अनब्रेकेबल सेलफोन सिरीज

Last Updated: Friday, December 23, 2011, 19:39

लावा मोबाईल्स कंपनीने अनब्रेकेबल म्हणजेच न तुटणाऱ्या ए 16 या फोनची सिरीज लँच केली. लावाचा फोन १२० किलोचा तडाखा सहन करु शकतो आणि त्याची किंमत ४००० ते ५००० रुपयां दरम्यान आहे. एमटीव्ही या टेलिव्हिजन चॅनलसोबत ही सेलफोनची सिरीज लँच करण्यात आली आहे.

स्टीव्ह जॉब्स यांना मरणोत्तर ग्रॅमी

Last Updated: Thursday, December 22, 2011, 11:51

ऍपलचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांना पुढच्या वर्षी मरणोत्तर ग्रॅमी ट्रस्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संगीताचा आस्वाद घेण्याच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करण्याच्या योगदानाबद्दल जॉब्स यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

ट्विटरच्या तंबूत अरब राजपूत्राचा चंचूप्रवेश

Last Updated: Monday, December 19, 2011, 14:35

सौदीचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल यांनी ट्विटरमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. प्रिन्स अलवालीद बिन तलाल हे जगातील अनेक बलाढ्य कंपन्यांमध्ये गुंतवणुकदार आहे. सौदीचे राजे यांचे पूतणे असलेले अलवालीद यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे मुल्यांकन २० बिलियन डॉलर्स इतकं आहे.

आकाश टॅबलेट ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 17:27

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेटचे निर्माते डाटाविंडने ३०,००० टॅबलेटची प्रत्येकी २५०० रुपये किंमतींनी ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. ऑनलाईन ऑर्डर नोंदवल्या नंतर सात दिवसात डिलिव्हरी देण्यात येणार आहे.

काँप्युटर्स, लॅपटॉप्स महागणार

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 14:06

इंटेलच्या या इशाऱ्यामुळे एचपी, डेल, लेनोवो, एसर अशा कम्प्युटर्स आणि लॅपटॉप बनविणाऱ्या कं पन्यांनीही तत्काळ पावले उचलत हार्ड ड्राइव्हचा उपलब्ध स्टॉक जपून वापरत कम्प्युटर्सच्या निर्मितीच्या वेगावर नियंत्रण आणले आहे.

गुगलचं नवं 'स्कीमर'

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 16:23

आता गुगलने आणखी एक गुगली टाकत नवे वेब अ‍ॅप्लिकेशन बाजारात आणले आहे. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांसाठी 'स्कीमर डॉट कॉम' सोशल नेटवर्किंग साइट गुगलतर्फे सुरू करण्यात आली आहे. फेसबुकच्या 'इव्हेण्ट्स'प्रमाणेच स्कीमरमध्येही अ‍ॅक्टिव्हिटीज आणि इव्हेण्ट्सचा पर्याय असणार आहे.

'ट्विटर' नवीन रूपात

Last Updated: Saturday, December 24, 2011, 14:49

आता 'ट्विटर' या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाने शुक्रवारपासून नवीन रूप धारण केले आहे.

काँग्रेसने केली फेसबुक, ऑर्कुट पोस्टर्सची होळी

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 06:03

सोशल नेटवर्किंग साईट्सबाबत सरकार दरबारी वाद धुमसत असतानाच त्याचे पडसाद इतरत्रही उमटू लागलेत. ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक, ऑर्कुटच्या पोस्टर्सची होळी केली.

रिलायन्सची चहाच्या किंमतीत ब्रॉडबँड सेवा

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 16:38

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजची २०१२ च्या अखेरीस टॅबलेट हाय स्पीड डाटा सेवा उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. रिलायन्स अवघ्या ३५०० रुपयात टॅबलेट लँच करणार आहे आणि त्यासोबत डाटाच्या १ जीबीसाठी दहा रुपये आकारणार आहे.

गुगल, याहू, फेसबुकला केंद्राची सक्त ताकीद

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 07:33

गुगल, याहू, फेसबुक या साईट्सना केंद्र सरकारने फैलावर घेतले आहे. अक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकण्यावर जोरदार हरकत घेतली आहे.