यूएस ओपन: रॉजर फेडररला पराभवाचा धक्का!

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 13:37

यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसलाय. चौथ्या फेरीतच फेडररचं आव्हान संपुष्टात आलं. स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोनं फेडररचा पराभव केला.

सानिया आणि पेसकडून भारतीयांच्या अपेक्षा!

Last Updated: Monday, September 2, 2013, 11:11

सानिया मिर्झा आणि चीनच्या झेंग जीनं अमेरिकन ओपनच्या चवथ्या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. 10व्या सीडेड सानिया-झेंग जोडीनं जर्मनीच्या ऍना लेना ग्रोएनेफेल्ड आणि चेक रिपब्लिकच्या क्वेटा पेश्के जोडीचा 6-2, 6-3 अशा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला.

विरेंद्र सिंग यांना सलाम कधी?

Last Updated: Sunday, September 1, 2013, 20:34

धावपटू अंजना ठमके आणि कविता राऊतसारख्या आदिवासी खेळाडूना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे प्रशिक्षक वीरेंद्र सिंग यांना दादोजी कोंडदेव पुरस्कारापासून डावलण्यात आलं आहे.

भारत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

Last Updated: Saturday, August 31, 2013, 13:04

पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल मिळवत यजमान मलेशियाला रोखत सामन्यात २-० अशी आघाडी घेत भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

सोमदेव देववर्मन यूएस ओपनच्या दुसऱ्या फेरीत

Last Updated: Thursday, August 29, 2013, 13:09

भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन यानं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत सोमदेवनं पात्रता फेरीतून प्रवेश केला होता. सोमदेवनं स्लोवाकियाच्या लुकास लैको याचा पराभव केला.

मला माझा मृत्यू दिसलाय – टायसन

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 08:47

खलनायक ठरलेला माजी मुष्टियोद्धा माईक टायसन एका वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. त्यांने आपले मरण पाहिले आहे. मला माझा मृत्यू दिसत असल्याचे त्याने म्हटले आहे. हा मृत्यू दारू आणि अमली पदार्थामुळे जवळ आल्याचे त्यांने नमुद केले आहे.

मंत्र्यांच्या फुकाच्या वल्गना, अजूनही अंधारातच अंजना

Last Updated: Monday, August 26, 2013, 18:29

राष्ट्रीय पातळींवर सर्व खेळाडूंचे विक्रम मोडीत काढून देशाचे नाव उज्वलं करु शकणा-या अंजनाचं वर्तमान मात्र आज अंधारात आहे.

भारतीय महिला टीमचा ‘सुवर्णवेध’!

Last Updated: Monday, August 26, 2013, 13:09

पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं शानदार कामगिरी करत सांघिक रिकर्व या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय. कोरियांच्या संघावर २१९-२१५नं मात केली.

ठाण्यात रंगली ‘खड्डे’मय मॅरेथॉन!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 15:31

२४व्या राज्यस्तरीय ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनवर पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटचं वर्चस्व पाहायला मिळालं. पुरुषांमध्ये आलम सिंगनं १ तास, ७ मिनिटं आणि ३७ सेकंदांची वेळ नोंदवत २१ किलोमीटरमध्ये बाजी मारली. मात्र ही मॅरेथॉन खऱ्या अर्थानं रंगली ती रस्त्यावरील खड्ड्यांमुळं.

कुस्तीचं फिक्सिंग, सुशीलकुमारचा गौप्यस्फोट

Last Updated: Saturday, August 24, 2013, 12:34

क्रिकेटमध्ये फिकिंग्स होते हे काही आता नवीन नाही मात्र आता कुस्तीसारख्या खेळामध्येही फिक्सिंगचं भूत आलंय. हे फिक्सिंगचं भूत छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये नाही तर चक्क ऑलिम्पिकमध्ये सारख्या स्पर्धांमध्येही असल्याचा गौप्यस्फोट केलाय भारताच्या ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारनं.