मुलाची हूल, निवडणुकीतून गूल; म्हणे, 'डॉक्टरचीच भूल'!

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 07:59

महेंद्र दुधे निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारीही सुरू केली होती. मात्र तिसरं अपत्य झाल्यानं त्यांची गोची झाली, तेव्हा तिसऱ्या अपत्याचं खापर त्यांनी चक्क डॉक्टरवरच फोडलंय.

शिकायचं फक्त श्रीमंतांनीच!

Last Updated: Monday, November 21, 2011, 10:57

नर्सरी, ज्युनिअर केजी वर्गांच्या प्रवेश अर्जांना सुरूवात झाली आहे. कुलाब्याच्या सेंट एना शाळेने प्रवेश अर्ज देतानाच श्रीमंत-गरीब असा भेद दाखवायला सुरूवात केली आहे. केवळ श्रीमंत भागातल्या विद्यार्थ्यांना अर्ज देण्यात येत आहे.

ऍथलिट सनी पाटीलला मदतीचा हात

Last Updated: Friday, November 18, 2011, 08:21

उरणच्या ऍथलिट सनी पाटीलची संघर्ष कथा झी चोवीस तासानं सर्वप्रथम जगासमोर आणली. झी चोवीस तासनं दाखवलेल्या वृत्तानंतर या होतकरू ऍथलिट्च्या मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत. मनसे आमदार राम कदम यांनी ट्रस्टच्या माध्यामातून सन्नीला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

संघर्ष इथे संपत नाही.....

Last Updated: Thursday, November 17, 2011, 14:27

उरणच्या एका रिक्षाचालकाच्या मुलानं मुंबई महाविद्यालयीन ४०० मीटर स्पर्धेत २१ वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला. सनी पाटील नावाच्या १९ वर्षीय ऍथलिटनं ४९.४ सेकंदाची वेळ नोंदवत ही शर्यत जिंकली.

वाल्याच्या झाला वाल्मिकी

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 06:26

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगलेल्या एका कैद्यानं आता न्यायालयात वकीली करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे खुनाच्या आरोपात शिक्षा भोगलेल्या हितेश शहा यानं आपली पदवी आणि वकिलीचं शिक्षण दोन्हीही कारागृहाच्या गजाआड राहून पूर्ण केलं.

पांढऱ्या सोन्याची झोळी खाली

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 06:29

विदर्भातील एकही नेता कापसाच्या हमीभावासाठी शेतक-यांची बाजू घेत आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार नाही. त्यामुळे कापूस उप्तादक शेतकरी पुरते हवालदिल झालेत.

कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय

Last Updated: Monday, November 14, 2011, 07:42

ऊस दरवाढीनंतर आता कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय.

एशियन गोल्ड मेडलिस्ट उपेक्षितच....

Last Updated: Sunday, November 13, 2011, 04:16

पॉवर लिफ्टर मिलिंद ताटे या प्रतिभाववान खेळाडूने एशियन आणि कॉमनवेल्थमध्ये भारताला गोल्ड मिळवून दिल. मात्र महाराष्ट्राच्या प्रतिभावान खेळाडूची घरची परिस्थिती एवढी हालाखीची आहे की त्याला रोजच्या जेवणावर खर्चही करणं परवडत नाही. या उपेक्षित खेळाडूचं आतापर्यंतच आयुष्यच संघर्षमय ठरल आहे.

कोकणचा राजा कोण ?

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 17:28

कोकणचा विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा राजकीय पट पुरता बदलला. समाजवादी आणि काँग्रेस अशा लढाईचं केंद्र असलेला हा प्रदेश समाजवादाची कास सोडून भगवा झाला आणि आता याच लाल मातीत वेगवेगळी संस्थानं निर्माण झाली.

ऑन ड्युटी पोलीस 'फुल्ल टाईट'

Last Updated: Monday, November 7, 2011, 16:24

पोलीस म्हणजे रक्षक पण आता मात्र हेच पोलीस रक्षक नसून भक्षक होत आहे. त्यांना आपल्या ड्युटीवर असण्याचा विसर पडेलेला दिसून येतो. ठाण्यातल्या राबोडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करणाऱ्या एका मध्यधूंद पोलीस अधिकाऱ्याला असाच काही विसर पडलेला दिसून येतो.