Last Updated: Thursday, June 13, 2013, 14:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई जिया खान हिच्या पत्रात उल्लेख असल्याप्रमाणे तिचा गर्भपात झाला होता, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. या वर्षांच्या सुरुवातीला तीचं अबॉर्शन झालं होतं, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. ३ जून रोजी तिनं जुहूस्थित राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.
जियाचा गर्भपात ज्या हॉस्पीटलमध्ये करण्यात आला होता तिथला डॉक्टर जिया आणि सुरज पांचोलीच्या चांगल्याच परिचयातील आहे. या गर्भपाताचा उल्लेख पहिल्यांदा पोलिसांना जियाच्या आईनं – राबिया खान यांनी समोर आणलेल्या जियाच्या सहा पानी ‘सुसाईड नोट’मध्ये सापडला होता. यामध्ये जियानं फसवणूक, बलात्कार, शारिरीक आणि मानसिक छळ असेही काही शब्द वापरले होते. मुंबई पोलीस या सर्व शब्दांची आणि त्यांच्या अर्थांची सखोल चौकशी करत आहेत. सूरजला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
‘यावर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत गोळ्यांच्या साहाय्यानं हा गर्भपात केला गेला होता. आम्ही डॉक्टरचं स्टेटमेंटही रेकॉर्ड केलेलं आहे’, असं पोलीस सूत्रांनी म्हटलंय. तसंच जियाचं सहा पानी पत्र हे जियानं आत्महत्या करण्याच्या काही वेळ अगोदर नाही तर बऱ्याच दिवसांपूर्वी लिहिलेलं होतं, असंही पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान, पोलिसांना सूरजच्या घरात आणखी पाच पत्र सापडली आहे. तसंच सूरजनं आपण जियासोबत गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची कबुली दिलीय. यानंतर त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचं कलम लावता येईल का? याची पडताळणीही पोलीस करत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 13, 2013, 14:13