फिक्सिंगचं `बॉलिवूड कनेक्शन` जाणीवपूर्वक? Bollywood Connection of Fixingय़

फिक्सिंगचं `बॉलिवूड कनेक्शन` जाणीवपूर्वक?

फिक्सिंगचं `बॉलिवूड कनेक्शन` जाणीवपूर्वक?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विंदू सिंगमुळे स्पॉट फ़िक्सिंगमध्ये बुकी आणि बॉलिवुडचं कनेक्शन समोर आलंय. पण यामागे बुकींचंच डोकं असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

फिक्सिंग प्रकरणात बेटिंगचा कधीना कधी भांडाफोड होणार याची पूर्वकल्पना असल्यानचं, त्यांनी जाणीवपूर्वक विंदू सिंगला या जाळ्यात ओढल्याची माहिती सुत्रांकडून पुढे येतेय. बॉलिवूड कनेक्शन समोर यावं यासाठीचं विंदूला बुकींनी गळाला लावलं होतं. अशी माहिती आता समोर येत आहे, आणि याची कल्पनाही विंदू सिंगला देण्यात आली होती, यासाठी विंदूला अनेक मार्गानं फ़ायदा ही झाल्याची चर्चा आहे.

कारवाई झाल्यानंतर, बॉलिवूडमधील मोठ्या नावांमुळे अडकलेल्या बुकींना त्याचा फायदाच होईल असा डावही यामागे होता. तसचं बुकींचे स्लीपर सेलही यानिमित्तानं सुरक्षित ठेवण्याचा बुकींचा प्रयत्न होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 21:11


comments powered by Disqus