सट्टेबाजीतील कमाई हरामा`ची, आम्ही ते करत नाही- छोटा शकी लWe are not involve in Betting- Chhota Shakil

सट्टेबाजीतील कमाई `हरामा`ची, आम्ही ते करत नाही- छोटा शकील

सट्टेबाजीतील कमाई `हरामा`ची, आम्ही ते करत नाही- छोटा शकील
www.24taas.com, झी मीडिया, दुबई

IPL च्या स्पॉट फिक्सिंगमध्ये डी कंपनीचं नाव सध्या गाजत आहे. स्पॉट फिक्सिंगचं दुबई कनेक्शन दाऊद इब्राहिमशी जाऊन मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दाऊदचा स्पॉट फिक्सिंगशी कुठलाही संबंध नसल्याचं दाऊद इब्राहमचा उजवा हात असणाऱ्या छोटा शकीलने म्हटलं आहे.

दाऊदला सट्टेबाजीच्या कमाईची अजिबात गरज नसल्याचं छोटा शकीलचं म्हणणं आहे. “सट्टेबाजीतली कमाई ‘हरामा’ची कमाई असून ‘भाई’ स्वतःही सट्टेबाजीपासून दूर राहातो आणि आम्हालाही सट्टेबाजीपासून दूर राहायला सांगतो. दाऊदचा कुठलाही फॅमिली मेंबर सट्टेबाजीत सामील नाही.” असं छोटा शकील म्हणाला. “पूर्वी आमची गँग सट्टेबाजी करत असे. मात्र आता आम्ही तो व्यवसाय सोडलाय. भाईचा विश्वासू शरद अण्णा शेट्टी हा व्यवसाय संभाळत असे. मात्र २००२मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कुणीही सट्टेबाजी करू नये, यासंदर्भात भाईने आम्हाला कडक सूचना दिल्या. आता आम्ही सट्टेबाजी करत नाही.” असंही छोटा शकीलने कबूल केलंय.

“आता आम्ही रियल इस्टेटचा बिझनेस करतो. कुठलाही गैरव्यवहार आम्ही आता करत नाही. आमच्याकडून कुणाला धमकी दिल्याचं नजिकच्या काळात कुणी ऐकलं आहे का? आम्ही रियल इस्टेटच्या धंद्यातून चांगला पैसा कमावतो. भाईला आता सट्टेबाजीच्या ङरमाच्या कमाईची गरज नाही.” असं शकील म्हणाला. सुनील दुबई या सट्टेबाजाशी असलेल्या ओळखीबद्दल विचारलं असता आपण सट्टेबाजांना ओळखत असलो, तरी आपला काही संबंध नसल्याचं डी-गँगने म्हटलंय. तसंच काही वृत्तवाहिन्यांनी उगीचच आमचं नाव या प्रकरणाशी जोडून आम्हाला बदनाम करत असल्याचं शकील म्हणाला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 15:51


comments powered by Disqus