मुंबई मनपासाठी शिवसेनेची उमेदवारांची यादी जाहीर झाली नसली, तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना उमेदवारांनी सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत ठाण्यामध्ये मनसेच्या नाराज कार्यकर्त्यांनी उद्रेक केला. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यासह राज्यातील इतर महापालिकांसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोणाचा पत्ता कट झाला आहे, आणि कोणाला संधी मिळणार हेदेखील स्पष्ट होईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा धुमशान होणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं या दोन पक्षातला संघर्ष पुन्हा झडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवाजी माने यांनी उपमुख्य़मंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अधिकृत प्रवेश केला. शिवाजी माने हे काँग्रेस हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आहेत. दरम्यान, एका पक्षाचा अध्यक्ष आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून उद्या राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी काल सांगलीत केला होता. मात्र, ते माजी खासदार असल्याने त्यांचा बार फुसका निघाल्याची चर्चा आहे.
फेसबुक, यू ट्युब, ट्विटर सोशल नेटवर्किंग साईटस्वर प्रचारासंदर्भात मजकूर किंवा माहिती अपलोड राजकीय नेत्यांना करता येणार नाही. जर करावयाची असेल तर राजकीय पक्षांनी आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.
आम चुनाव 2014