जिल्हा परिषद निवडणूक उद्या ७ फेब्रुवारी २०१२ला घेण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणजेच जिल्हा परिषद निवडणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते आहे.
भाजप उमेदवार दशरथ वनवेंवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला चढवल्याची घटना घडली.
ठाण्यातली आघाडी तोडण्यासाठी शिवसेनेनं ऑफर दिल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजीव नाईक यांनी केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी आधीच रणशिंग फुकंले आहे. या निवडणुकीत बाळासाहेब यांनी प्रचाराचा नारळ या आधीच फोडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या ठाकरी शैलीत विरोधकांवर टीका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.
दादरच्या बालेकिल्ल्यात मनसे आपली बंडाळी थोपविण्यात यश आलं आहे. बहुतांश बंडोखांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, तर उमेदवारीपासून डावलण्यात आलेले नाराज आता राजीखूशी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीला हळूहळू रंग चढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेवर सेना-भाजपचा भगवा पुन्हा फडकविण्यासाठी आता या निवडणुकीच्या रणसंग्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांनी उडी घेतली आहे.
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मनसेला परवानगी नाकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच्या रस्त्यावर सभा घेणारच, असं आव्हान राज यांनी दिले आहे.
तिकीट नाकारल्यानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खासदार प्रिया दत्त समर्थक आक्रमक झालेत. प्रिया दत्त यांच्या ऑफिससमोर समर्थक कृपाशंकर सिंहविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करतायत.
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी आज येथे दिली.
महापालिका आणि झेडपी निवडणुकांमध्ये बंडाळीला ऊत आला आहे. या बंडाळीमुळे अनेक पक्षांच्या नाकेनऊ आले आहेत.
महापालिकेचा रणसंग्रामात होण्याआधी राज ठाकरेंनी मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेऊन श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेत भंडाराही उधळला.
निवडणूक आली की राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशिवाय अनेक हवशे-गवशे-नवसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात. मात्र अमेरिकेत शिकलेला, नासामध्ये नोकरी केलेला एक तरुण झेडपीच्या आखाड्यात उतरला आहे.
परभणी जिल्ह्यातील चाटोरी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड यांची उमेदवारी जिल्हा सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. समाजवादी पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सौ.केवलादेवी रामनयन यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या महापालिकेत पक्षाचे बलाबल पाच आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.
अर्ज भरण्याची मुदत संपण्याला अवघा एक तास शिल्लक असतानाच, काँग्रेसनं मुंबई मनपा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादी फक्त २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस एकूण १६९ जागांवर लढणार असून, त्यातल्या १३९ वॉर्डांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नाराज कार्यकर्ते काय करु शकतात याचा उत्तम नमुना ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच नाराज शिवसैनिक अंकुश पाटील या कार्यकर्त्याने चक्क स्नेहा देशमुख उमेदवाराचा एबी फॉर्मच पळून नेला.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीच बंडखोरीचे निशाण फडकावलं आहे. विलेपार्लेत प्रभाग क्रमांक ८० मध्ये पराग अळवणींच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर आता राज पुरोहितांच्या सूनेनंही तोच कित्ता गिरवला आहे.
मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी कॉंग्रेसविरोधात उघड बंड केलं आहे. तिकीट वाटपाच्यावेळी पैसे घेतल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यांनी केला आहे. सामन्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. सावंत हे गुरूदास कामत गटाचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. त्यामुळे कामत गटातील कार्यकर्त्यांनी डावल्याची चर्च आहे. अन्याय झाल्याचे सांगत मीना देसाई, कमलेश यादव यांनी बंडखोरीचा पर्याय स्वाकारला आहे.
कोकणात नारायण राणे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहचला आहे. राणेंनी उद्या कुडाळमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचं जाहीर केलं असताना त्याआधीच त्यांचे कट्टर समर्थक माजी आमदार शंकर कांबळी यांना फोडून राष्ट्रवादीनं राणेंना आणखी एक दणका दिला आहे.
वडाळ्यात वॉर्ड 169 मधून अखेर महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळालीय. त्यामुळं इच्छुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर नाराज झालेत. त्यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय. खुल्या गटासाठी असलेल्या 169 वॉर्डमधून उमेदवारीसाठी श्रद्धा जाधव आणि नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यात चुरस होती अखेर त्यात महापौरांनी बाजी मारलीय.
आम चुनाव 2014