केंद्रीय मत्री शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅकShashi Tharoor`s Twitter account hacked, temporarily

केंद्रीय मत्री शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

केंद्रीय मत्री शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. हॅक केल्यानंतर या अकाऊंटवरन एका पाकिस्तानी पत्रकारानं काही रोमॅन्टिक मॅसेज सुद्धा पाठवले आहेत.

शशी थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पाकिस्तानी पत्रकार असलेल्या मेहर तरार यांना ट्वीट पाठवलं गेल्यानंतर सोशल मीडियावर जणू भूकंपच आला. पत्रकार मेहरनं सुद्धा या ट्विटवर उत्तर दिलं आणि नंतर लगेच ट्विटर इंडियाला याचा तपास करायलाही सांगितलं.

मात्र त्यानंतर मेहरनं ट्वीट केलं की आता कोणत्याही मॅसेजला ती उत्तर देणार नाही, ट्विटर आजची क्रेझ झालाय. टेक्नॉलॉजीचा काही नकारात्मकही भाग आहे. हेच नाही, ज्यानं शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केलंय, त्यांनी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या अकाऊंटवरुनही मेहर तरार यांच्यासाठी ट्वीट केलं आणि उलट-सुलट लिहिलं.

ट्विटर अकाऊंटवर होत असलेल्या गोंधळानंतर शशी थरूर यांनी आपल्या पेजवर खरोखर ट्वीट करत, सर्वांची माफी मागत, माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याचं सांगितलं आणि काही काळासाठी आता ते बंद राहिल हे स्पष्ट केलं. सर्वांना याबाबत सहकार्य करण्याची मागणीही शशी थरूर यांनी केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 16, 2014, 10:35


comments powered by Disqus