Last Updated: Friday, January 17, 2014, 23:04
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पण, त्यांच्या मृत्यूनं मात्र सगळ्यांनाच धक्का बसलाय. असाच धक्का सुनंदा पुष्कर यांच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनाही बसलाय. मेहर तरार यांनी ‘ओह माय गॉड’ असं ट्विट केलंय.
'व्हॉट द हेल सुनंदा... ओह माय गॉड... मी उठले आणि मला धक्का बसला हे अतिशय दुर्दैवी आहे. सुनंदा हे काय केलंस! सुनंदाच्या आत्म्याला शांती मिळो' असं मेहर तरार यांनी ट्विट केलंय.
केंद्रीय मंत्री शशि थरुर हे दोन दिवसांपूर्वी अचानक एका ट्विटमुळे चर्चेत आले होते. सुनंदा पुष्कर यांनीच शशी थरूर यांच्यावर त्यांचं पाकिस्तानी पत्रकारसोबत अफेअर असल्याचा आरोप करत आपणंच मेहर यांची काही वक्तव्य थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून जगजाहीर केल्याचं सुनंदा यांनी म्हटलं होतं. यावेळी आपण थरुर यांच्याशी घटस्फोट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
यापूर्वी, सारवासारव करत शशी थरुर यांनी आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आपल्या फेसबुक अकाऊंटवरून सुनंदा आणि आपल्या वतीनं त्यांनी एक पोस्ट टाकलं. यामध्ये त्यांनी ‘सुनंदा आणि आपण आनंदी दाम्पत्य जीवन जगत असल्याचं’ म्हटलं होतं.
मेहर तरारला रोमॅन्टीक मॅसेज केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही वादग्रस्त आणि रोमॅन्टिक मॅसेज पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या दाम्पत्यामध्ये वाद सुरू झाला होता. मात्र, आपलं अकाऊंट हॅक झालं असून काही काळासाठी आता ते बंद करतोय, असं शशी थरूर यांनी स्पष्ट केलंय आणि ते वादग्रस्त ट्वीट्स अकाऊंटवरुन डिलिट करण्यात आले आहेत.
अकाऊंट हॅक झाल्याचं नाटक? मात्र, थरूर यांच्या या वक्तव्यानंतर सुनंदा पुष्कर यांनी ‘ना माझं ना शशी थरूर यांचं हॅक झालं असल्याचं’ स्पष्ट केलं. मीच थरूर यांचं अकाऊंट उघडून त्यावरुन हे मॅसेज पोस्ट केले, कारण मेहर तरार कसे मॅसेज पाठवतेय हे सर्वांना कळावं. ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीय, असं त्यांनी म्हटलं.
ती माझ्या नवऱ्याचा पाठलाग करतेय एका वृत्तपत्रासोबत बोलतांना सुनंदा पुष्कर म्हणाल्या, “आमचं अकाऊंट हॅक झालेलं नाही. मीच माझ्या अकाऊंटवरुन तिला उत्तर देणारे मॅसेज पाठवले होते. मी हे अजिबात सहन करू शकत नाही.
‘ती एक पाकिस्तानी महिला आहे जी की, आयएसआय एजंट आणि ती माझ्या नवऱ्याचा पाठलाग करतेय. मग पुरुष कसे असतात ते तुम्हाला माहितीच आहे’ असं सुनंदा यांनी मेहर तरार आणि शशी थरुर यांच्याबद्दल म्हटलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 17, 2014, 22:31