Last Updated: Saturday, January 18, 2014, 12:22
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसलाय. यामध्ये अनेक राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पाहुयात कुणी कुणी काय म्हटलंय...
मेहर तरार, पाकिस्तानी पत्रकार व्हॉट द हेल सुनंदा... ओह माय गॉड... मी उठले आणि मला धक्का बसला... हे अतिशय दुर्दैवी आहे. सुनंदा हे काय केलंस! सुनंदाच्या आत्म्याला शांती मिळो.
ललित मोदी, आत्ताच ही धक्कादायक बातमी कळली. सुनंदाबद्दलची ही बातमी खूपच धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सुनंदाच्या आत्म्याला शांती मिळो.
सोनू निगम, गायक सुनंदा वेडी आहेस का तू... का असं केलंस... तू असं करुच कसं शकतेस. असं होऊच शकत नाही!
विजय मल्ल्या मला प्रचंड धक्का बसलाय... मी तिला न्यू ईअरच्या पार्टीत भेटलो होतो सुनंदाच्या आत्म्याला शांती मिळो.
दिया मिर्झा मला प्रचंड धक्का बसलाय… इतकी छान, उत्साही आणि माझी मस्त मैत्रीण तुझ्या आत्म्याला शांती मिळो
शिल्पा शेट्टी सुनंदाच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आणि दुःखही झालं. तिच्या आत्म्याला शांता लाभो...
फराह अली खान, सुनंदाची मैत्रिण कुणीतरी प्लीज त्या मेहर तरारला सांगा की, तुझं थोबाड बंद कर आणि सुनंदा निदान आता तरी खोटारडी म्हणू नकोस... कारण सुनंदा कधीच खोटं बोलत नाही. काही तरी आदर दाखव...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 17, 2014, 23:16