Last Updated: Thursday, January 16, 2014, 11:52
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीनेहमीच विविध वादांमध्ये अडकणारे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. मात्र यावेळी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनीच शशी थरूर यांच्यावर त्यांचं पाकिस्तानी पत्रकारसोबत अफेअर असल्याचा आरोप केलाय.
थरूर यांना सोडचिठ्ठी हवीयएका वृत्तपत्रासोबत बोलतांना सुनंदा पुष्कर म्हणाल्या की तिला आता थरूर सोबत घटस्फोट घ्यायचाय. आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याचं स्पष्टीकरण शशी थरूर यांनी देताच सुनंदा पुष्कर यांचं हे वक्तव्य आलंय.
मेहर तरारला रोमॅन्टीक मॅसेजकेंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही वादग्रस्त आणि रोमॅन्टिक मॅसेज पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर हा वाद सुरू झालाय. मात्र आपलं अकाऊंट हॅक झालं असून काही काळासाठी आता ते बंद करतोय, असं शशी थरूर यांनी स्पष्ट केलंय आणि ते वादग्रस्त ट्वीट्स अकाऊंटवरुन डिलिट करण्यात आले आहेत.
अकाऊंट हॅक झाल्याचं नाटक? मात्र, थरूर यांच्या या वक्तव्यानंतर सुनंदा पुष्कर यांनी ना माझं ना शशी थरूर यांचं हॅक झालं असल्याचं स्पष्ट केलंय. मीच थरूर यांचं अकाऊंट उघडून त्यावरुन हे मॅसेज पोस्ट केले, कारण मेहर तरार कसे मॅसेज पाठवतेय हे सर्वांना कळावं. ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीय.
ती माझ्या नवऱ्याचा पाठलाग करतेयएका वृत्तपत्रासोबत बोलतांना सुनंदा पुष्कर म्हणाल्या, “आमचं अकाऊंट हॅक झालेलं नाही. मीच माझ्या अकाऊंटवरुन तिला उत्तर देणारे मॅसेज पाठवले होते. मी हे अजिबात सहन करू शकत नाही.
ती एक पाकिस्तानी महिला आहे जी की, आयएसआय एजंट आणि ती माझ्या नवऱ्याचा पाठलाग करतेय. मग पुरुष कसे असतात ते तुम्हाला माहितीच आहे.
सुनंदा पुष्कर संतापल्याएका वृत्तपत्रासोबत बोलतांना सुनंदा पुष्कर म्हणाल्या, “आमचं अकाऊंट हॅक झालेलं नाही. मीच हे ट्वीट केले होते. मी हे अजिबात सहन करू शकत नाही. ती एक पाकिस्तानी महिला आहे जी की, आयएसआय एजंट आणि ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीय. मग पुरुष कसे असतात ते तुम्हाला माहितीच आहे. मी हे सहन करू शकत नाही. तो या अटेन्शनमुळं खूश आहे.
आयपीएल दरम्यानही अशाच काही प्रकरणांचा मला सामना करावा लागला होता. आता पुन्हा तसंच घडणं मला मान्य नाही. अजून यावर मला काहीच बोलायचं नाही”, या शब्दात सुनंदा पुष्कर यांनी आपला राग वक्त केला आणि शशी थरूर यांच्या नव्या प्रकरणाबद्दल माहिती दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 16, 2014, 11:22