‘आकाश’हून स्वस्त ‘टी पॅड’ टॅबलेट
‘आकाश’ टॅबलेट हा जगातला आत्तापर्यंतचा सर्वांत स्वस्त टॅबलेट पीसी मानला जात होता. मात्र, आता बीएसएनएलहीस्पर्धेत उतरलं असून त्यांचा टी-पॅड हा आकाशहून स्वस्त टॅब सादर केला आहे. ३,२५० रुपयांपासून या टॅबची किंमत सुरू होते. असे ३ वेगवेगळे टॅब्स बीएसएनएलने आणले आहेत.
पेंटा टी-पॅड
बीएसएनएलचा सर्वांत स्वस्त टॅबलेट पीसी ‘पेंटा टी पॅड- आयएस ७०१’ हा आहे. या टॅबची किंमत ३२५० रुपये आहे. तसंच ‘पेंटा टी-पॅड आयएस ७०४सी’ची किंमत १०,९९९ रुपये आहे. आणि ‘टी-पॅड डब्ल्यूएस ८०२सी’ची किंमत १३,५०० रुपये आहे.
‘पेंटा टी-पॅड’ची वैशिष्ट्यं
BSNL आणि पेंटल या कंपन्यांच्या पार्टनरशीपने आणलेला पेंटा टी-पॅड IS 701 मध्ये ७ इंचाचा रेसिस्टिव्ह टचस्क्रीन डिसप्ले आहे. प्रोसेसर १ गीगाहर्ट्झ असून २५६ MBची रॅम आहे. याचबरोबर अँड्रॉइड २.३ ऑपरेटिंग सिस्टम आहे.
BSNL टी-पॅड WS 704 C
BSNL टी-पॅड WS 704 C मध्ये ५१२MB DDR 3 रॅम आहे. त्याला HDMI जोडून टीव्हीही लावू शकतो. यामध्ये अँड्रॉइड २.३ ऑपरेटिंग सिस्टम आहे.
BSNLचा WS 802 C
BSNL च्या WS 802 C या टॅबमध्ये ८ इंचाचा डिसप्ले स्क्रीन आहे. १.२ GHz चा प्रोसेसर आणि ५१२ MBची डीडीआर ३ रॅम आहे. याशिवाय ग्लोबल पोझिशन सिस्टम यामध्ये इनबिल्ट आहे.
डिस्काउंटेड डेटा प्लॅन
BSNL सोबत नॉएडाच्या पेंटल कंपनीने हे टॅब्ज बनवले आहेत. हे तिन्ही टॅबलेट्स BSNLच्या डिस्काउंट डेटा प्लॅनसह विकले जातील.
/marathi/slideshow/आकाशहून-स्वस्त-टी-पॅड-टॅबलेट_185.html/7