कुठे आहेत हे विमानतळ
सुट्टीचे दिवस सुरू झाले आहेत. अनेकांना विमानाने अनेक ठिकाणी जायला आवडते. पण जर तुम्हाला कळलं की तुम्ही ज्या विमानतळावर उतरणार आहात. हे विमानतळ जगातील काही खतरनाक विमानतळांपैकी एक आहे. तर कसं वाटेल तुम्हाला. तर आता पाहूया जगातील काही डेंजर विमानतळ.
सी आइस रनवे, अंटार्टिका
अंटार्टिकावरील हे एअरपोर्ट पूर्णपणे बर्फावर बनले आहे. याकारणाने एअरपोर्टच्या रनवेवर जास्त वजन दिले तर, रनवे तुटण्याची शक्यता आहे. संपूर्ण एअरपोर्ट बर्फावर असल्याने विमान उतरताना ते सरकण्याची भिती देखील असतेच. येथे विमानाचे लँडींग करताना विमान १० इंचापेक्षा जास्त खोल बर्फात रुतणार नाही, याची काळजी घेणं हे वैमानिकाच कौशल्य यावेळी कामास येते.
काईटक एअरपोर्ट, हाँगकाँग
हे एअरपोर्ट १९९८ मध्ये बंद करण्यात आलं. रनवेच्या उत्तरेस मोठे डोंगर आणि इमारती असल्याने हे एअरपोर्ट ६व्या नंबरचे खतरनाक एअरपोर्ट आहे. याच कारणाने हे एअरपोर्ट बंद करण्यात आले
टेंझींग हिलरी, नेपाल
हे एक लहान एअरपोर्ट असून एका टेकडीवर बांधण्यात आलं आहे. या एअरपोर्टवर रनवेच्या शेवटी ९,००० फूट दरी आहे. तसेच रनवेची लांबी फारच कमी आहे. त्यामुळे विमान लॅंडींग आणि टेकिंग घेताना धोका धरु शकतो.
फुनचाल, मदेरिया
हे एअरपोर्ट एका आयलँडच्या किनाऱ्यावर बांधलं आहे. या एअरपोर्टवरून उड्डान करणं आणि लँडींग करणं फारच जिकिरीचं आहे. हे एअरपोर्ट अनेक खांबांवर उभे आहे.
कोचोवेल, फ्रान्स
हे एअरपोर्ट `एल्पस`च्या डोंगरावर १,७२२ च्या उंचीवर बनवण्यात आलं आहे. याचा रनवे खूपच लहान आणि चढणारा आहे. रनवेचा शेवट हा खोल दरीने होतो. या रनवेवर उतरण्यासाठी वैमानिकाला एक वेगळ ट्रेनिंग देण्यात येतं. रनवेवर विमान उतरवताना बाजूला असलेल्या बर्फामूळे काही वेळेस लँडींग करताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे येथील विमान प्रवास खतरनाक आहे.
बारा, स्कॉटलँड
या एअरपोर्टला सगळ्यात आश्चर्यचकित करणाऱ्या एअर लॅंडींगचं वोट देण्यात आलं आहे. याचा अर्थ इथे लँडींग करणं म्हणजे मरणाच्या तोंडातून बोहेर येण्यासारखंच आहे. १००० वैमानिकांवर केल्या गेलेल्या सर्वेक्षणात या एअरपोर्टला सगळ्यात `डेंजर एअरपोर्ट`चं वोट देण्यात आलं आहे.
मॅकेटेन एअर स्ट्रिप, अफ्रीका
या रनवे ला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटेल. या रनवेच्या अगदी शेवटी एक मोठी आणि मोठी दरी आहे आणि याच्या बाजूलाच मोठे डोंगर देखील आहेत. `लेसोथो`मध्ये असलेल्या या एअरस्ट्रिपवरुन उड्डाण केल्यावर पोटात भितीचा गोळा येतो. एक देखील छोटीशी चूक सरळ विमानाला दरीत पाडू शकेल किंवा डोंगरावर क्रॅश करू शकेल.
साबा आयलँड एअरपोर्ट, कॅरेबियन
नवविवाहीत हनिमूनसाठी कॅरेबियनला प्राधान्य देतात. मात्र, काही गोष्टींची त्यांना माहिती नसते. या डेस्टीनेशनवर असा एक एअरपोर्ट आहे की त्याची भीती वाटते. या एअरपोर्ट जगातील सर्वात लहान रनवे आहे. या सोबतच येथील एअरपोर्ट चारही बाजुंनी समुद्र आणि डोंगराने व्यापलेला आहे. या कारणाबरोबरच तो लहान असल्याने तो धोकादायक ठरु ठकतो. याचे नाव डेंजर विमानतळांपैकी एक आहे
/marathi/slideshow/जगातील-काही-डेंजर-विमानतळ_323.html/8