Thursday, July 10, 2025
Thursday, July 10, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

फूटबॉल स्टार्स आणि त्यांच्या प्रेम कहाण्या...

फूटबॉलपटूंचे पार्टनर

फूटबॉलपटूंचे पार्टनर

‘फिफा वर्ल्डकप २०१४’चा फिव्हर फूटबॉल प्रेमींवर चढलाय... फूटबॉलच्या जगतात खेळण्यासाठी हे खेळाडू जेवढे प्रसिद्ध आहेत... तेवढेच ते प्रसिद्ध आहेत त्यांच्या प्रेम कहाण्यांसाठी... किंबहुना त्यांच्या प्रेमकहाण्या या त्यांच्या खेळापेक्षा जास्त चर्चिल्या जातात, असं म्हटलं तरी त्यात काही वावगं ठरणार नाही...

चला तर पाहुयात, असेच काही फूटबॉल स्टार्स त्यांच्या सुंदर प्रेयसी आणि त्यांच्या प्रेमकहाण्या...





.

ख्रिस्टियानो रोनाल्डो - ईरिना श्यॅक

ख्रिस्टियानो रोनाल्डो - ईरिना श्यॅक

ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि ईरिना श्यॅक... एक फुटबॉलविश्वातील सुपरस्टार आणि एक मॉडेलिंगविश्वातील सुपर मॉडेल अशी ही जोडी चर्चेचा विषय ठरणार नाही तर काय होणार... ‘प्ले बॉय’ अशी इमेज असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डच्या आयुष्यात ईरिना श्यॅक ही रशियन ब्युटी आली आणि त्याच्या आयुष्यातही स्थिरता आली.

‘अर्मानी एक्सचेंज कॅम्पेन’ दरम्यान ख्रिस्टियानो आणि ईरिना प्रथम भेटले आणि 2010 पासून हे कपल डेटींग करु लागले. दरम्यान, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही वादळही आली. मात्र, दोघांचा एकमेकांवर असलेला गाढ विश्वासामुळेच त्यांचं हे नात टिकून राहीलं. ईरिना सध्या तिच्या करियरमध्ये एक-एक उंची गाठत आहे तर ख्रिस्टियानोही आपल्या करियरमध्ये मग्न आहे. अशात दोघांनाही एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळेच ख्रिस्टियानो आणि ईरिनाच ब्रेक अप झालं, या अफवेने जोर पकडला. मात्र, ईरिनाने वारंवार या अफवांचं खंडन केलं.

त्यातच ख्रिस्टियानो एका अमेरिकन महिलेच्या मुलाचा पिता बनला. ख्रिस्टियानोने ईरिनाला फसवल असून त्यांच ब्रेक अप झालं, अशी अफवाही पसरली. मात्र, तरीही या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये काहीही फरक पडला नाही. याच दरम्यान फेडरर आणि नदालची मॅच पाहण्यासाठी ख्रिस्टियानो-ईरिनाची जोडी एकत्र दिसली आणि त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काहीही बिनसलेलं नाही, हे त्यांच्या देहबोलीवरुन दिसून आलं.

ख्रिस्टियानोने जिंकलेल्या गोल्डन बूट पुरस्कार समारंभाच्या वेळी तर ईरिनाच्या बोटातील रिंगने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि हा इव्हेंट ईरिना आणि तिच्या रिंगने हायजॅक केला.

ईरिना ही आपल्या मॉडेलिंग असाईनमेंटसाठी जगभर प्रवास करत असते. 2011च्या स्पोर्टस इलूस्ट्रेटेड स्विमसूट या मॅग्निझनवर ती कव्हर मॉडेल म्हणून झळकली होती. तर 2014मध्ये हर्क्युलस या फिल्मद्वारे तिने अभिनय क्षेत्रातही डेब्यू केलाय.

इंग्लिश मॉडेल एलिस गुडविन आणि गेम्मा एटकिन्सबरोबर रोमान्स करणाऱ्या ख्रिस्टियानोच्या आयुष्यात ईरिना श्यॅकने तीन वर्षांपूर्वी एन्ट्री केली आणि आता ही हॉट फेव्हरिट जोडी या वर्ल्ड कपमध्येही साऱ्यांसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरलीय.





.

शकिरा - जेरार्ड पिके

शकिरा - जेरार्ड पिके

शकिरा... मोस्ट फेमस फुटबॉल वॅग... आपला आवाज आणि अदांनी तिनं साऱ्या जगाला मोहिनी घातलीय. मात्र, तिला मोहिनी घातली ती स्पेनचा फुटबॉल प्लेअर जेरार्ड पिके यानं!

शकीराचं वाका वाका हे गाण 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये चांगलंच गाजलं. याच गाण्याच्या शूटींगदरम्यान या दोघांची भेट झाली आणि मग हे दोघे डेटींग करु लागले. दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असून शकीरा जेरार्ड पिकेपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. मात्र, वयातील ही तफावत त्यांच्यातील प्रेमाच्या कधीही आड आली नाही. स्पेनचा डिफेंडर जेरार्ड पिके आणि शकिरा 2010 पासून डेट करत असून 2011 मध्ये तिने ट्विटरद्वारे आपल्या या नात्याची कबुली फॅन्सला दिली. दोघांचं छायाचित्रही तिने यावेळी ट्विटरवरुन प्रकाशित केलं.

तर 2012 मध्ये तिने आपण जेरार्ड पिकेच्या मुलाची आई होणार असल्याचं जाहीर केलं आणि 22 जानेवारी 2013 मध्ये शकिराने जेरार्डच्या मुलाला जन्म दिला. मिलान पिके अस नाव असलेल्या या चिमुकल्याभोवतीच सध्या या दोघांचं आयुष्य फिरत आहे.

कोलंबियाच्या या सिंगरचा आवाज तर मंत्रमुग्ध करणारा आहेच याचबरोबर तिची अदाही घायाळ करणारी अशीच आहे. 2010 च्या वाका वाका गाण्याने सारे रेकॉर्ड मोडित काढले. तर यावर्षीच्या वर्ल्ड कपसाठी असलेल्या ला... ला... ला गाण्यात जेरार्ड पिकेचीही झलक चाहत्यांना पहायला मिळतेय.

जेरार्डचा ग्राऊंडवरील वावर आणि ग्राउंडबाहेरील शकिराची अदा हेच यावर्षीच्या वर्ल्ड कपमध्येदेखील आकर्षणाच केंद्रबिंदू ठरलाय.




.

इकेर कॅसियस - सारा

इकेर कॅसियस - सारा

2010च्या वर्ल्ड कपला गवसणी घातल्यानंतर स्पेनचा कॅप्टन इकेर कॅसियसने स्पोर्टस जर्नलिस्ट सारा कार्बोनेराला इंटरव्यू दिला आणि या इंटरव्यूनंतर इकेरने घेतलेल्या किसने फुटबॉल विश्वात एकच खळबळ माजवून दिली.

‘द सेक्सिएस्ट रिपोर्टर इन द वर्ल्ड’ अशी बिरुदावली प्राप्त केलेल्या स्पेनच्या या टीव्ही रिपोर्टर साराने जगातील बेस्ट गोलरमध्ये समावेश असलेल्या इकेर कॅसियसवर केवळ मोहिनीच घातली नाही तर त्याची एकाग्रताही भंग केली. 2010 वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये स्पेनच्या या कॅप्टनची गर्लफ्रेंड सारा कार्बोनेरामुळे एकाग्रता भंगली आणि त्यामुळेच स्पेनला पहिली मॅच गमवावी लागली असा दावा केला गेला. ईकेर आणि सारा यांचं रिलेशनशिप हा त्यावेळी मीडियामध्ये डिबेटचा विषय बनला होता. स्पेनच्या या पराभवाला त्यावेळी सारा कार्बोनेराला जबाबदार धरलं गेलं होतं.

मात्र, याच वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर सारा कार्बोनेराने घेतलेल्या इंटरव्यूनंतर आनंदात असलेल्या ईकरने साराचा किस घेत या विजयाचा आनंद तर साजरा केलाच याचबरोबर खुलेआम आपल्या प्रेमाची कबुली दिली.

दरम्यान कार्बोनेरा हिने इकेरच्या घेतलेल्या इंटरव्यूनंतर तिच्या पत्रकारीतेबाबतच्या एकनिष्ठतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. कार्बोनेरामुळेच इकेरचे 2010च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक फोटो काढले गेले. स्पेनमधील तो `वन ऑफ द मोस्ट फोटोग्राफ्ड पिपल ऑफ द वर्ल्ड` ठरला.

मात्र प्रोफेशनल वादविवादांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि त्यांच्या संबंधावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्यांच्यातील नात अधिकच दृढ होत गेलं आणि 3 जानेवारी 2014 मध्ये या वादग्रस्त कपलने एका मुलाला जन्म दिला. मार्टीन कॅसियल असं या चिमुकल्याचं नाव असून यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही `वन ऑफ द मोस्ट फोटोग्राफ्ड` कपलबरोबर आता त्यांचा हा चिमुकलाही दिसण्याची शक्यता आहे.





.

लिओनेल मेसी-एँटोनेला रोक्युझो

लिओनेल मेसी-एँटोनेला रोक्युझो

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते, असं म्हटल जातं आणि अर्जेंटीनाचा स्ट्राईकर लिओनेल मेसीच्या आयुष्यात तर हे अगदी खरंच घडलंय. जगातील मोस्ट व्हॅल्युएबल फुटबॉल प्लेअर असलेल्या लिओनेल मेसी याच्यामागे आहे एँटोनेला रोक्युझो... त्याची गर्लफ्रेंड

मेसी आणि एँटोनेला यांची लव्ह स्टोरी अगदी बालपणापासूनच सुरु झाली. पाच वर्षांचे असताना मेसी आणि एँटोनेला यांची भेट झाली. या दोघांचीही कुटुंब फॅमिली फ्रेंड असल्याने दोघेही एक प्रकारे एकत्रच वाढले. एँटोनेला ही लिओनेलच्या कझिनची बेस्ट फ्रेंड होती आणि मग ती लिओनेलची बेस्ट पार्टनर बनली.

दरम्यान लिओनेल फुटबॉल खेळण्यासाठी अर्जेंटीनातून बार्सिलोनामध्ये स्थलांतरित झाला त्यानंतर काही दिवसांतर तो पुन्हा युरोपला स्थलांतरित झाला. तरीही दोघांमधील भौगोलिक अंतर काही त्यांच्या नात्यांमध्ये दूरावा निर्माण करु शकलं नाही. सुट्टीच्या दिवशी लिओनेल एँटोनेला रहात असलेल्या रोसारियो इथं जात असे. 2009मध्ये ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये ते पुन्हा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर मीडियाने त्यांचा पिच्छा केला आणि या दोघांची अनेक छायाचित्र छापून आली... तरीही या कपलने आपलं नात लो प्रोफाईल राहील याची दक्षता घेतली. कधी एँटोनेला मेसीला भेटण्यासाठी बार्सिलोनाला येत असे तर कधी तर लिओनेल मेसी अर्जेंटीनाला एँटोनेलाला भेटण्यासाठी जात असे. अर्जेंटीनातील ब्युनोस एअर्समध्ये चातेऔ टॉवरमध्ये 34व्या मजल्यावर या दोघांमधील रोमान्सला अधिकच रंग चढत होता. फुटबॉल विश्वातील या व्हेरी व्हेरी व्हीआयपी कपलने तीन वर्षांच्या आपल्या कोर्टशिपनंतर २०१२ मध्ये एका बाळाला जन्म दिला. थिंगो मेसी असं नाव असलेला हा चिमुकला आज या दोघांच्या प्रेमाचं प्रतिक बनलाय.



.

वेन रुनी - कुलीन रुनी

वेन रुनी - कुलीन रुनी

इंग्लंडचा फुटबॉलपटू वेन रुनीच्या प्रेमाचं रुपांतर विवाहात झालं. लहान वयातच वेन रुनी आणि त्याची पत्नी कुलीन रुनी यांची भेट झाली. सहा वर्षांच्या कोर्टशिपनंतर विवाहबंधनात अडकलेल्या या स्टार कपलला दोन गोड मुलंदेखील आहेत.

वेन रुनी आणि कुलीन रुनी यांची प्रेमकथा एका सामान्य प्रेमी युगलांप्रमाणे आहे. एव्हढंच की वेन आणि कुलीनची भेट ही अगदी लहान वयात झाली. इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रुनी आणि त्याची पत्नी कुलीन रुनी यांची भेट वयाच्या 12व्या वर्षी झाली आणि 16व्या वर्षी त्यांच्यामध्ये कोर्टशिपला सुरुवात झाली.

सहा वर्षांच्या डेटींगनंतर हे स्टार कपल विवाहबद्ध झालं. 12 जून 2008 मध्ये वेन आणि कुलीन पोर्टोफिनो इथं विवाहबद्ध झाले. त्यांच्या विवाहाची छायाचित्र आणि माहिती त्यांनी एका ब्रिटन मॅगझिनला तब्बल 2.5 मिलियन पौंडाला विकल्यामुळे त्यांचा हा विवाह चांगलाच चर्चेत राहिला होता. याचबरोबर विवाहामधील काही धार्मिकबाबींमुळेही त्यांच्या विवाहामध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, वेन आणि कुलीनच्या प्रेमासमोर हे सारं काही दुय्यम होतं.

विवाहानंतर हे स्टार कपल फॉमर्बि इथंल्या एका मॅन्शनमध्ये रहायला गेलं. त्यांच्या या अत्याधुनिक सुखसोयींनीयुक्त असलेल्या आशियानाची किंमत तब्बल 1.3 मिलियन पौंड एवढी होती. त्यांच्या या बहुचर्चित विवाहानंतर 2 नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. केई वेन रुनी असं त्याचं नामकरण करण्यात आलं. तर 21 मे 2013 मध्ये या स्टार कपलने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
सात वर्षांच्या त्यांच्या विवाहदरम्यान काही प्रसिद्धीमाध्यमांनी वेन रुनीने कुलीना मारहाण केल्याचं वृत्तही दिलं. मात्र वेन रुनीने अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत केस तर जिंकलीच याचबरोबर आपल्या आणि कुलीनमध्ये काहीही बिनसलं नसल्याची खात्री त्याने आपल्या चाहत्यांना दिली. कुलीनसारखी साथ देणारी पत्नी, दोन गोड मुलं आणि एक आशियाना असं वेन रुनीचं एक सुखी वैवाहिक आयुष्य आहे. ज्याचा कुणालाही नक्कीच हेवा वाटेल.





.

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

More Slideshow

लेनोवो के ९००

एलजी `फ्लूटर` फोन

हिरोईनची खलनायक भूमिका

आठवणीतले आर.डी.बर्मन

सोनीचा `एक्सपिरिया एम`

वयाच्या अगोदर नका होऊ म्हातारे!

मिररलेस कॅमेरा - गॅलॅक्सी एनएक्स

`फादर्स डे`

टाटाची नवीन मॉडेल

मोदींचा करिष्मा - अडवाणींचा वरचष्मा

प्रेमाचा पाऊस... पावसाची गाणी

सोनाक्षी सिन्हा!

First Prev .. 6 7 8 9 10  .. Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/फूटबॉल-स्टार्स-आणि-त्यांच्या-प्रेम-कहाण्या_336.html/8