नाशिक महापौरांच्या दौरा की फार्स!

Last Updated: Thursday, June 13, 2013, 19:29

नाशिकच्या पहिल्या पावसात महापौरांचाच प्रभाग जलमय झाला. मग आज महापौरांनी आमदार आणि आयुक्तांसह दौरा करून पाणी का साचलं याचा शोध घेतला. पण हा दौरा म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.

राज वादाचे पडसाद नाशिक महापौरांना भोवणार

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 15:57

मनसे आणि खडसे वादाचे पडसाद भाजप-मनसे युती असलेल्या नाशिकमध्येही उमटलेत. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमहापौरांनी चक्क महापौरांच्या विरोधात प्रेसनोट काढून आपला राग व्यक्त केलाय.

मनसेचा नाशिक, औरंगाबादमध्ये जल्लोष

Last Updated: Thursday, March 15, 2012, 17:01

नाशिकमध्ये महापौरपदी मनसेचा उमेदवार बसणार हे पक्कं झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. वाद्यांच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते, त्यांच्या हातात फडकणारे मनसेचे झेंडे आणि जयजयकाराच्या घोषणा यांनी नाशिकमधलं वातावरण दुमदुमून गेल होते.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- राज

Last Updated: Thursday, March 15, 2012, 15:10

नाशिक महापालिकेच्या सत्तासंपादनानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतलीय. नाशिकचा विकास करुन दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

नाशिकच्या महापौरपदाचा आज निर्णय

Last Updated: Thursday, March 15, 2012, 09:26

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या मनसेनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपनंही मनसेला साथ देण्याचं ठरवलं आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही.

राज-मुनगंटीवार भेटीने नाशिकचा गुंता सुटणार?

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 18:58

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला महापौर होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकमध्ये महापौर मनसेचा की भाजपचा?

Last Updated: Monday, March 12, 2012, 23:16

नाशिक महापालिकेच्या सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे महायुतीचा धर्म पाळणार, असं भाजप म्हणत आहे. तर त्याचवेळी जनादेशाचा आदर राखला जाईल, असं म्हणत मनसेला पाठिंब्याचे संकेतही भाजपनं दिले आहेत.

नाशिक महापौर : उद्धव यांचे मौन

Last Updated: Saturday, March 10, 2012, 22:56

मुंबई आणि ठाण्याचे महापौरपद जिंकल्यानंतर नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मौन पाळल आहे. नाशिक महापौर कोणाचा असेल यावर त्यांनी बोलणं टाळलं आणि याबाबत लवकरच तुम्हाला समजेल,असं सांगितल. उद्धव यांच्या या भूमिकेमुळे राजकीय गणित काय असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंचा 'माईंड गेम', भाजपचा करणार 'गेम'?

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 09:18

नाशिकच्या सत्ता समीकरणात दिवसेंदिवस नवी रंगत येते आहे. मुंबईत महापौरपदाची मागणी करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी थेट नाशिकच्या महापौरपदाची ऑफर देऊन नवा गुगली टाकली आहे.

राज'मार्ग' अवघडच....

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:31

मुंबई महापालिका निवडणूकीत किंग बनण्याचं स्वप्न मनी बाळगेल्या राज ठाकरेंची निकालानंतर निराशाच झाली. मुंबईतल्या असमाधानकारक कामगिरीसाठी काही प्रमाणात स्वतः राज ठाकरे यांना तर ब-याच प्रमाणात पक्षसंघटनेला जबाबदार मानलं जातंय. मुंबई महापालिका निवडणूकीचे निकाल पाहाता 2014 साली होणा-या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीनं मनसेला कामगिरी सुधारण्यासाठी बराच वेळ हाती आहे.

सर्वपक्षीय संमतीनेच रिपाइंचा महापौर शक्य- आठवले

Last Updated: Monday, February 27, 2012, 21:11

काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये आरपीआयचा महापौर करुन सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बारगळल्याची चिन्हं दिसत आहेत. छगन भुजबळ यांनी आठवलेंना आरपीआयचा महापौर करण्याची ऑफर दिली होती. भुजबळांनी त्यासाठी सेना, भाजपची मदत मिळवून द्या, असं आठवलेंना सांगितलं होतं

नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला...

Last Updated: Sunday, February 26, 2012, 19:33

नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची राजकीय आकडेमोडीचा गुंता सुटता सुटत नाही आहे. मातोश्रीवर झालेल्या सेना-भाजपच्या युतीच्या बैठकीत बाळासाहेबांनी वेगळ्या बोळात घुसू नका. असा सूचक इशारा दिल्यानं मनसेची कोंडी झालीय. पुणे पॅटर्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येतय. मात्र काँग्रेसनं जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नसल्याचं सांगितलं आहे.

काँग्रेसच्या पवित्र्याने भुजबळांची कोंडी

Last Updated: Thursday, February 23, 2012, 16:31

नाशिक महापालिकेत महापौरपदासाठी रामदास आठवलेंच्या रिपाइं उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्टपणे राष्ट्रवादीला सांगण्यात आल्याचं वृत्त आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे छगन भुजबळांना मोठा हादरा बसला आहे.