अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...

Last Updated: Thursday, December 26, 2013, 15:55

बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.

वाळू माफियांने केली सरपंचांची हत्या

Last Updated: Saturday, August 24, 2013, 11:01

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील सरपंचावर वाळू माफियाने जेवणाचे निमंत्रण देऊन विषप्रयोग करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर मोहगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

अकोल्यात शिवसेना कार्य़कर्त्याची गोळी घालून हत्या

Last Updated: Saturday, August 24, 2013, 10:34

अकोला जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य़कर्ते आणि सरपंच यांची गोळ्या झाडून तर भंडारा जिल्ह्यात विषप्रयोग करून सरपंचांची हत्या करण्यात आली आहे. वाळू माफियांचा हैदोस सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले हे.

माजी सरपंचाच्या हत्येत सतेज पाटील अडकणार?

Last Updated: Thursday, February 14, 2013, 11:34

कोल्हापुरात बुधवारी दुपारी झालेल्या पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय.

सरपंचाकडे न्याय मागायला गेलेल्या महिलेवर बलात्कार

Last Updated: Thursday, January 31, 2013, 16:59

नाशिकच्या येवल्यामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कातिल सिद्दीकीचा मारेकरी निवडणूक रिंगणात

Last Updated: Thursday, December 6, 2012, 12:49

येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला गुंड शरद मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यातल्या मुठा गावातून शरद मोहोळ उपरसरपंचपदाची निवडणूक लढवणार आहे.

...अन् हाणामारीचाही दर्जा घसरला!

Last Updated: Saturday, November 24, 2012, 18:37

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील पाचगावमध्ये आज सरपंचपदाच्या निवडणुकीवरुन पुन्हा दोन्ही गटात वाद पेटून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आलीय. यामध्ये पोलिसांची गाडीही फोडण्यात आलीय.

गडचिरोलीत दहशत नक्षलींची की पोलिसांची?

Last Updated: Thursday, July 12, 2012, 23:17

नक्षलवाद्यांच्या उच्छादामुळे आधीच दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता लोकशाही धोक्यात आलीय. कोरची या अतिदुर्गम तालुक्यात आज ९० टक्के ग्रामपंचायतीतल्या लोकप्रतिनिधींनी एकाच दिवशी सामूहिक राजीनामे दिल्यानं प्रशासन हादरलंय. याशिवाय एकाच दिवशी ३० पोलीस पाटलांनीही राजीनामे दिलेत.

अपहरण केलेल्या सरपंचांची हत्या

Last Updated: Thursday, May 10, 2012, 09:21

इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळे परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या केलेल्या सरपंचाचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला.

नक्षलवाद्यांकडून सरपंचांचे अपहरण

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 08:46

गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. मंगळवारी सरपंचाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र अजून तपास लागलेला नाही.

सरपंचांसाठी विधानपरिषदेचे दरवाजे बंद

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 18:56

सरपंचांना विधान परिषेदेचे दरवाजे बंद झाले आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करुन त्याऐवजी १४ सरपंचांना विधान परिषेदत संधी द्यावी, असा केंद्राचा प्रस्ताव होता.

'द न्यु इंडिया वुमन' जावळखेडच्या सरपंचांना

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 15:44

'द न्यु इंडिया वुमन' या विषयावर मुंबईत कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री तर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला.

साताऱ्यात बंदूक विकत घेताना संरपंचाला अटक

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 05:30

साताऱ्यात अवैधपणे पिस्तूल विकणाऱ्या युवकास आणि विकत घेणाऱ्या सरपंचास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्हा गुप्तवार्ता पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कराड प्रमिलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या लहूकुमार जयकुमार सिंग या युवकाची झडती घेतली.