पाझर तलावात पाणी नाही पण ‘पैसा’ पाझरला!

Last Updated: Friday, May 2, 2014, 22:01

औरंगाबाद पाझर तलाव योजनेत भ्रष्टाचार उघड झालाय. जालना जिल्ह्यातल्या पाझर तलाव घोटाळा प्रकरणी औरंगाबाद लाच-लुचपत विभागाने सिंचन विभागातल्या चार माजी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आठ वर्षाचा बॉडीबिल्डर बनला स्टार!

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 11:51

आठ वर्षाच्या बॉडीबिल्डरचे फेसबुकवरील पाच हजार पेक्षाही जास्त चाहत्यांनी ऑनलाईन फोटो शेअर केलेत. ब्रॅडन ब्लेक असं या मुलाचं नाव असून, तो आयर्लंड इथला रहिवाशी आहे.

पाहा - कोयनेत पाण्याखाली अनोखा आविष्कार

Last Updated: Friday, January 3, 2014, 13:12

स्थापत्य अभियांत्रिकीचा अनोखा आविष्कार सध्या कोयनेच्या पाण्याखाली अनुभवायला मिळतोय. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीच काम सध्या सुरु आहे. कोयनेच्या टीमनं दाखवलेलं धाडस तसेच कौशल्यामुळ आपल्या राज्याचं सुमारे १६०० कोटींचं संभाव्य नुकसान टळलं आहे.

मंत्र्यांनी मारली पाण्यात उडी, वाचवला लोकांचा जीव!

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 23:59

कर्नाटकातल्या एका ६१ वर्षांच्या मंत्र्यांनी तलावामध्ये उडी मारून बुडणाऱ्या कारमधल्या सहा जणांना वाचवण्याचा पराक्रम केला आहे. मंगळवारी हा प्रकार बेंगळुरूजवळ घडला.

Exclusive - रंकाळ्याची सफाई जीवावर उदार होऊन

Last Updated: Monday, August 26, 2013, 21:50

कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावातले पाणी हिरवे झाल्यानं आजूबाजूला दुर्गंधी पसरलीय. रंकाळ्याची ही परिस्थीती बदलण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं दोन बोटीच्या माध्यमातून उपायोजना सुरु केल्यात. पण या बोटीवर काम करणा-या सात कर्मचा-य़ाना मात्र जीव मुठीत धरुन काम करावं लागतंय.

रंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात

Last Updated: Thursday, August 15, 2013, 00:02

ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.

वेगाचा बेताज बादशाह; ओन्ली बोल्ट!

Last Updated: Monday, August 12, 2013, 13:20

जमैकाचा तेज तर्रार धावपटू उसेन बोल्टनं ९.७७ सेकंदात शंभर मीटर अंतर पूर्ण करीत वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपची फायनल जिंकली

बाप्पाच्या तलाव विसर्जनाला बंदी!

Last Updated: Monday, July 22, 2013, 12:59

एकिकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगर पालिकेने बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या तलावात विसर्जनावर बंदी आणली आहे.

तलावाचा गाळ उपसताना सापडले दंतकथेतील मंदिराचे अवशेष!

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 20:39

कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिग्रे गावामध्ये तळ्यातला गाळ काढताना एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तळ्याच्या मध्यभागी असलेलं मंदिर शेष नारायणाचं असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय.

मुंबईकरांना गुड न्यूज, तलाव भरले!

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 21:13

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनं तलावक्षेत्रात पाण्याची पातळी वाढतीये. पाऊसमान असंच राहिल्यास लवकरच तलाव ओसंडून वाहू लागतील, अशी स्थिती आहे. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये साडे तेरा लाख दशलक्ष लिटर साठा असणं आवश्यक आहे.

औरंगाबादमध्ये पाणीटंचाईचं संकट

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 08:16

औरंगाबादेत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अर्ध्या औरंगाबादला शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलावही आता पूर्णपणे आटलाय.. शहरात आधीच दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.. त्यामुळं आता काय होणार या भितीने औरंगाबादकर धास्तावलेत....

उसेन बोल्टचे `गोल्ड` रनींग

Last Updated: Friday, August 10, 2012, 10:07

लंडन ऑलिंम्पिकमध्ये जमैकाच्या उसेन बोल्टनं शंभर मीटर पाठोपाठ २०० मीटरच्या शर्य़तीतसुध्दा गोल्ड मेडल पटकावलयं. त्याची वाऱ्याशी स्पर्धा असल्याचे दिसून आले.

धावपटू ब्लेकला 'आयपीएल'चे डोहाळे...

Last Updated: Thursday, August 9, 2012, 00:33

‘लंडन ऑलिम्पिक २०१२’मध्ये धावण्यात रौप्यपदक पटकावल्यानंतर उसेन बोल्टला पुन्हा क्रिकेटचे डोहाळे लागलेत. आपल्याला आयपीएलमध्ये खेळायचंय, अशी इच्छा आता त्यानं व्यक्त केलीय. इतकंच नाही तर सुपरफास्ट भारताचा गोलंदाज झहीर खानपेक्षाही आपण वेगानं बॉलिंग करू शकतो, असंही ब्लेकनं म्हटलंय.

...आणि राज ठाकरे घाबरले

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 15:54

मी महाराष्ट्राचा..महाराष्ट्र माझा.. ज्यांनी हे वाक्य राज्यात रूजवले ते राज ठाकरे. माझ्या महाराष्ट्रावर कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याला बघू घेईन, असे सांगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. कोणी अंगावर आले तर सोडणार नाही... माझ्या नादाला लागू नका..तुम्हाला महागात पडेल, असे बेधड वक्तव्य करणारे...भल्याभल्यांना घाम फोडणारे आणि सळो की पळो करून सोडणारे राज ठाकरे हे ही घाबरतात. त्यांनीच ही कबुली दिली आहे. निमित्त होते एका पुस्तक प्रकाशनाचे.

फाळकेंच्या स्मारकासाठी वास्तूच नाही!

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 20:58

चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं नाशिकमध्ये दादासाहेब फाळकेंच्या वास्तूचं स्मारक उभारण्याची घोषण मुख्यमंत्र्यांनी केली खरी, पण ही घोषणा आता घोषणाच राहण्याची शक्यता आहे. कारण नाशिक शहरात फाळकेंची अशी कुठलीही वास्तू शिल्लक नाही.

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 16:14

बुलढाणा जिल्ह्यातील वरवंड इथं 2 सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झालाय. त्यातील एक जण विवाहित आहे.

महाराष्ट्र एक पाऊल पुढे

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 23:55

1999 च्या तुलनेत यावेळचा लेक टॅपिंग हे जास्त नियोजनबद्ध आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचं होत.. यशवंतराव चव्हाण याच्या जन्मशताब्दी वर्षात आणि कोयना धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राला सर्वार्थानं वरदायी ठरलेल्या कोयना प्रकल्पाचा 4 ब हा प्रकल्प देशाला अर्पण होतोय..ही प्रत्येक मराठी मनासाठी अस्मितेची गोष्ट ठरली.

कोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 11:28

कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार होणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत.

नागपूर : तलावात बुडून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 12:34

नागपूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. अभियांत्रिकी कॉलजेच्या तीन विद्यार्थ्यांना पोहताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.