`हिट अँड रन` प्रकरणी सलमानला ६ मे रोजी हजर राहण्याचे आदेश

Last Updated: Monday, April 28, 2014, 17:02

२००२ सालातील हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे. नवीन खटल्याची सुरुवात असल्यानं न्यायालयानं सलमान खानला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

अबब... एका लग्नासाठी ५०३ कोटींचा खर्च!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 18:49

देशात भूकमारीमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागत असताना दुरीकडे याच देशात लोक करोडो रुपये खर्च करत आहे ते फक्त लग्नासाठी पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहे. उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भाची सृष्टी मित्तल हीच लग्न स्पेनमध्ये बार्सिलोना या शहरात झाले. या लग्नामध्ये ५०३ करोड रुपये पेक्षाही अधिक खर्च करण्यात आला. त्या दिवशी बार्सिलोना पूर्ण पणे थांबून गेले. सृष्टी मित्तल ही लक्ष्मी निवास यांच्या लहान भावाची प्रमोद मित्तल यांची मुलगी आहे.

‘हीट अँड रन’ सलमानला दिलासा, नव्यानं होणार सुनावणी

Last Updated: Thursday, December 5, 2013, 15:28

हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.

अंध बांधवांची राज ठाकरेंनी दखल घेतली

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 19:43

वरळीतल्या अंध उद्योग गृहाची दुरवस्था झी मीडियानं उघड केल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतलीये. मनसेनं तातडीनं या वसतीगृहात मुलांना मदत पाठवलीये

EXclusive- अंध उद्योग गृहाची दुरावस्था, ढेकणांचा सुळसुळाट

Last Updated: Monday, July 15, 2013, 20:26

वरळीमध्ये असलेल्या एका अंध वसतीगृहात प्रचंड दुरवस्था असल्याचं समोर आलंय... NSD इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड असं या संस्थेचं नाव आहे. या वसतीगृहाची इमारत पूर्ण मोडकळीस आलीये. इथं महाराष्ट्राबरोबरच देशभरातून अंध विद्यार्थी येतात...

मुकेश अंबानींना कशासाठी सुरक्षा, कोर्टाने फटकारले

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 22:59

देशात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तिला सुरक्षा मिळते, मात्र सर्वसामान्यांचे काय? अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले आहे. उद्योगपती मुकेश अंबानींना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेच्या मुद्दावर कोर्टानं सरकारला फटकारलंय.

मेट्रो धावणार सुसाट, आज होणार चाचणी

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 11:41

महाराष्ट्र दिनाचं अवचित्य साधून मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वर्सोवा येथे या चाचणीला हिरवा कंदील दाखवणार.

मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा

Last Updated: Monday, April 22, 2013, 12:30

उद्योगपती आणि रिलायन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयानं मंजूर केला आहे. त्यामुळे अंबानी यांनी आता खास सुरक्षा मिळणार आहे.

कोल्हापुरातल्या उद्योगांना घरघर

Last Updated: Thursday, January 10, 2013, 08:33

जागतिक मंदीचा उद्योगांना मोठा फटका बसला. त्यामधून कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग जगतही सावरु शकला नाही. त्यामुळं प्रत्येक उद्योजक महाराष्ट्राच्या नव्या औद्योगिक धोरणात काहीतरी चांगलं मिळेल यांच्या प्रतिक्षेत आहेत.

आर आर पाटील आणि नारायण राणे यांच्यात जोरदार खडाजंगी

Last Updated: Thursday, January 10, 2013, 08:34

आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत नवे औद्योगिक धोरण आणि महिलांवरील अत्याचारांवरून गृहमंत्री आर आर पाटील आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जोरदार खडाजंगी झाली.

दिल्ली गँगरेप : कॅमेऱ्याच्या साहाय्यानं सुनावणी

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 09:06

दिल्लीमध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या सामाहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी एका स्थानिक न्यायालयात सोमवारी सुरू झाली. पण या सुनावणीसाठी न्यायालयात एकच गर्दी झाल्यानं सगळ्यांचाच गोंधळ उडाला. त्यामुळे आरोपींना न्यायालयात उपस्थित न करता कॅमेऱ्याच्या साहाय्यानं या प्रकरणाच्या सुनावणीचे आदेश देण्यात आलेत.

क्लिनीकल ट्रायल... मृत्युची प्रयोगशाळा...

Last Updated: Friday, January 4, 2013, 21:48

बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून घेतल्या जात असलेल्या अनियंत्रीत वैद्यकीय चाचण्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नेमक्या काय आहेत या चाचण्या... त्या संदर्भात कोणते नियम आहेत आणि ही परिस्थिती का निर्माण झालीय... याचाच घेतलेला हा सडेतोड वेध... `मृत्युची प्रयोगशाळा...`

अन् नारायण राणे चिडले...

Last Updated: Thursday, January 3, 2013, 20:05

उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज औद्योगिक धोरणाबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार आणि राणे यांच्या चांगली शाब्दिक बाचाबाची झाली.

सेझच्या जमिनी गृहप्रकल्पांसाठी नाहीत - राणे

Last Updated: Thursday, January 3, 2013, 16:28

राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणात सेझची जमीन गृहप्रकल्पांना देण्याची कुठलीही तरतूद नसल्याचं औद्योगिक मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय.

४.५ लाख महिलांवर पाक सैनिकांचा बलात्कार

Last Updated: Monday, December 17, 2012, 19:19

१९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात अमानुषतेचा कळस गाठणार्याच पाकिस्तानी सैनिकांनी सुमारे साडेचार लाख बांगलादेशी महिलांवर बलात्कार केल्याची माहिती एका विशेष अभ्यासात उघड झाली आहे.

मुस्लिमांना हवेत गुजरातमध्ये मोदी - सरेशवाला

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 17:36

गुजरातमध्ये जे दंगे उसळले होते. त्यावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चहुबाजूने टीका करण्यात येत असताना मुस्लिमांना गुजरातमध्ये मोदीच हवे आहेत. हे सांगितले उद्योगपती जफर सरेशवाला यांनी. त्यांनी मुस्लिमांना आवाहन केलेय की, मोदींच्या पाठिशी राहा.

मुकेश अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

Last Updated: Sunday, November 11, 2012, 16:49

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा काळा पैसा स्वीस बॅंकेत ठेवण्यात आला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर अंबानी यांचा काळापैसा त्वरीत भारतात आणावा आणि सरकारकडे सोपवावा, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांकडून केली. यावेळी काही कार्यकर्ते अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

इ़जिप्तच्या माजी राष्ट्रपतींना जन्मठेप

Last Updated: Saturday, June 2, 2012, 14:48

इ़जिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा घोषित करण्यात आल्यानंतर इजिप्तमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

एड्सवर परिणामकारक लस लवकरच

Last Updated: Sunday, January 8, 2012, 12:41

एडस रोगाच्या विरोधातली दीर्घकाळ चाललेली लढाई अखेर मानव जिंकेल अशी आशा निर्माण झाली आहे. सिमियन इम्युनोडेफिशीन्सी व्हारयस म्हणजेच एस आय व्ही या एडसच्या सर्वात घातक प्रकारवरच्या लशीचा माकडावरचा प्रयोग यशस्वी ठरला आहे

'झी २४ तास'च्या वतीनं कोल्हापुरात इंडस्ट्रियल समिट

Last Updated: Thursday, December 1, 2011, 05:20

'झी २४ तास'च्या वतीनं शुक्रवारी कोल्हापूर इंडस्ट्रियल समिटचं आयोजन 2 डिसेंबरला करण्यात आलंय. या समिटमध्ये कोल्हापूरातील उद्योग विकासावर चर्चा केली जाणाराय.