Last Updated: Wednesday, February 27, 2013, 17:10
www.24taas.com, अहमदनगरमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज अहमदनगरमध्ये बैठक सुरू आहे. काल अहमदनगरमध्ये राज ठाकरे मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
कालच्या दगडफेकीनंतर आज राज ठाकरे अहमदनगरमध्ये मनसैनिकांशी संवाद साधत आहेत. दगडफेकीच्या प्रकारानंतर राज हे नगरच्या आयरीस हॉटेल मध्ये मुक्कामी होते... त्यानंतर त्यांनी कार्यकत्यांच्या मेळाव्यासाठी शासकिय विश्रामगृह गाठलं...
शासकीय विश्रामगृहाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे. काल रात्री दगडफेक झाल्यानंतर राज ठाकरे मनसैनिकांना काय आदेश देतात, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
कालच्या दगडफेकीनंतर आज महाराष्ट्रात अनेक ठिकणी त्याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड झाली. त्यामुळे राज यांच्या बैठकीत नक्की काय सुरू आहे याकडेच साऱ्या मनसैनिकांचे लक्ष आहे. राज ठाकरे अहमदनगरमध्ये मनसैनिकांशी संवाद साधत आहे.
First Published: Wednesday, February 27, 2013, 17:01