अखेर त्या बिबट्याचा मृत्यू

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 08:57

चंद्रपूर जिल्ह्यातील आलेसुर गावात शेळ्यांवर ताव मारण्यासाठी आलेल्या एका पूर्ण वाढीच्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. वनविभागाच्या पथकाकडे बचाव कार्यासाठी अपुरी साधनं असल्यानं हा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय.

कुत्र्याला पाहून बिबट्याने ठोकली धूम....

Last Updated: Monday, March 3, 2014, 20:02

मुंबईच्या गोरेगाव इस्ट परिसरात एका सोसायटीमध्ये 26 फेब्रुवारीच्या पहाटे पावणेचारच्या सुमारास एक बिबट्या घुसला होता... हा बिबट्या सोसायटीमध्ये बराच वेळ फिरत होता. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये हा बिबट्या क़ैद झाला....

बिबट्याची ओळख पटायचेय, प्रधान वनसचिवांचे उत्तर

Last Updated: Monday, April 22, 2013, 10:56

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक बिबट्याची ओळख पटली नसल्याचा दावा राज्य सरकारचे प्रधान वनसचिव प्रवीण परदेशी यांनी केलाय. चंद्रपुरातल्या वनात सध्या या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे.

बिबट्याने शार्प शूटर्स टीमलाच दिला चकवा

Last Updated: Sunday, April 21, 2013, 14:09

ताडोबाच्या जंगलाशेजारी नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी तैनात असलेल्या शार्प शूटर्सच्या सहा टीम्सला बिबट्याने चकवा देत पुन्हा हल्ला चढवलाय.

पाण्याविना बिबट्यानं अन् हरणानं गमावले प्राण!

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 17:39

कडक उन्हाळा आणि दुष्काळाची वाढती भीषण दाहकता यामुळे पाण्याकरता वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांचं दृश्य काही नवीन नाही. मात्र, अशीच काहीशी परिस्थिती आता वन्य प्राण्यांचीही होताना दिसते य. पाण्याच्या शोधात एका बिबट्यानं तसंच एका हरणानं आपले प्राण गमावलेत.

वाट चुकलेल्या बिबट्याचा ११ तासांचा धुमाकूळ...

Last Updated: Saturday, February 9, 2013, 18:30

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या बोर्ली या गावात जवळजवळ ११ तास धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलंय. त्यामुळे नागरिकांच्या जीवात जीव आलाय.

बिबट्याची रवानगी... विहिरीतून पिंजऱ्यात

Last Updated: Thursday, October 25, 2012, 22:13

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात गोरेगावमध्ये एका विहिरीत पडलेल्या नऊ महिन्याच्या बिबट्याला तब्बल सात तासांनंतर बाहेर काढण्यात वन खात्याला यश आलंय.

बिबट्याने पळविलेल्या मुलीचा मृत्यू

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 09:55

मुलुंडमध्ये बिबट्याने उचलेल्या मुलीचा मृत्यू झाला. नॅशनल पार्कमधून आठ वर्षांच्या सुनीता थोरात या मुलीला बिबट्याने पळविले होते.

नगरमध्ये बिबट्या मादी जेरबंद

Last Updated: Saturday, March 10, 2012, 19:37

संगमनेर तालुक्यातल्या रायतेवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या मादी जेरबंद झाली. या मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तिच्याच बछड्यांचा उपयोग केला आणि बछड्यांच्या ममत्वापोटी ती मादी अलगद पिंज-यात अडकली गेली. मात्र, असं असलं तरी मातेपासून दुरावलेल्या या बछड्यांना पुन्हा मायेची उब मिळाल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

दिवसभरात दोन ठिकाणी बिबट्यांच्या हैदोस, 2 ठार

Last Updated: Sunday, November 27, 2011, 13:06

विरारमध्ये वज्रेश्वरी रोड येथील वस्तीमध्ये बिबट्या घुसला. त्याने या मानवी वस्तीमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराटीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.