पुण्यात अशीही घटना...इच्छाशक्ती असेल तर...

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 10:36

ऐकून विश्वास बसणार नाही, पण गेल्या १० वर्षात घडली नाही ती गोष्ट पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये घडली. महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण गणवेशासह शालेय साहित्य उपलब्ध झालंय. त्यामुळे इच्छाशक्ती असेल तर कुठलीही लोकोपयोगी योजना अपेक्षित वेळेत राबवणं अवघड नसल्याचं स्पष्ट झालंय.

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ मुं शिंदे यांची निवड

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 14:30

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ मुं शिंदे यांची निवड झालीये. या निवडणुकीत एकूण ९०४ मतं पडली. यातली १४ मतं अवैध ठरली. फ मुं शिंदे यांना ४६० मतं मिळाली.

विश्वास पाटीलांचे चोरीचे हस्तलिखित सापडलं

Last Updated: Friday, August 9, 2013, 08:13

लेखक विश्वास पाटील यांच्या नव्या कादंबरीचे चोरीला गेलेलं हस्तलिखित अखेर सापडलंय. ठाण्यात मँजेस्टिक बुक स्टॉलसमोर पार्क केलेल्या गाडीतुन पाटलांची करड्या रंगाची ब्रिफकेस चोरीला गेली होती, यात `पाषाण झुंज` या आगामी पुस्तकाची हस्तलिखित होते.

यंदाचं अ. भा. मराठी साहित्‍य संमेलन सासवडमध्‍ये!

Last Updated: Sunday, July 14, 2013, 18:06

८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद सासवडला मिळालंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ.माधवी वैद्य यांनी पुण्यात आज ही घोषणा केली.

दलित आणि ओबीसी सर्वाधिक भ्रष्टाचारी- आशिष नंदी

Last Updated: Saturday, January 26, 2013, 19:39

जयपूर साहित्य संमेलनात समाजशास्त्रज्ञ आणि लेखक आशिष नंदी यांनी दलित आणि ओबींसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झालाय.

ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचं निधन

Last Updated: Thursday, January 17, 2013, 23:45

ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचं आज पुण्यात निधन झालय. त्या 86 वर्षोंच्या होत्या.

साहित्यातील नोबेल चीनच्या मो यान यांना

Last Updated: Thursday, October 11, 2012, 21:43

जागतिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा साहित्यातील २०१२ या वर्षाचा नोबेल पुरस्कार चीनचे लेखक मो यान यांना जाहीर झाला आहे. स्वीडीश अकादमीने आज स्टॉकहोम येथे या पुरस्काराची घोषणा केली. विज्ञान, साहित्य आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो.

चंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष

Last Updated: Saturday, February 4, 2012, 09:04

डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्‍वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या ‘माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले.