भारतीय वंशाचे नायपॉल ब्रिटनमध्ये 'प्रभावशाली'

Last Updated: Monday, January 27, 2014, 22:47

नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे लेखक व्ही. एस नायपॉल आणि शिक्षणासाठी लढा देणारी पाकिस्तानची मलाला युसूफजई यांचा समावेश ब्रिटनच्या ५०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला आहे.

मलालाच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाक शाळेत बंदी

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 12:40

संयुक्त राष्ट्रसंघाने गौरविलेल्या आणि तालिबानी विचारांविरोधात आवाज उठविलेल्या पाकिस्तानी मलाला युसुफजाई हिच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाकिस्तान शाळेत बंदी घालण्यात आली आहे.

मला पाकिस्तानचा गर्व, लढाई शिक्षणासाठीच- मलाला

Last Updated: Monday, October 14, 2013, 17:30

मी पाकिस्तानची मुलगी असून मला पाकिस्तानी असण्याचा गर्व आहे, असे उद्धगार काढलेत ते युसफजाई मलालानं...

तालिबानला उपरती, मलालाची सहानभूती

Last Updated: Thursday, July 18, 2013, 11:56

एक मुल (विद्यार्थी), एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन याच्यामाध्यमातून (शिक्षणातून) जग बदलण्याची ताकद निर्माण होते, असा संदेश देणारी १६ वर्षीय मलाला युसुफजई हीला ताबिलाने साथ घातली आहे. तू पाकिस्तानात परत ये आणि येथील मदरशात प्रवेश घे. तेथे तू शिकव आणि तुझी लेखणी इस्लामसाठी वापर, असा सल्ला तालिबानच्या एका नेत्याने दिलाय.

मलाला `आवाजा`ची जगाला नवी ओळख

Last Updated: Saturday, July 13, 2013, 11:17

मलाला यूसुफजई हे नाव गेल्या वर्षी जगभरात चर्चेत आलं. पाकिस्तानमध्ये मुलींना शिक्षणावर बंदी घालण्याच्या विरोधात उठलेला हा एक चिमुकला आवाज. तो आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला. पण आज त्या आवाजाला नवी ओळख मिळालीय.

मलाला संयुक्त राष्ट्रात बोलली, अन् सर्व अचंबित झालेत!

Last Updated: Saturday, July 13, 2013, 09:32

प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.

मलालाची तालिबान्यांना जोरदार चपराक...

Last Updated: Thursday, March 21, 2013, 09:27

पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी पंधरा वर्षीय कार्यकर्ती मलाला युसुफझईने तालिबान्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय... तिनं पुन्हा एकदा ब्रिटनमधल्या शाळेत जाणं सुरु केलंय.

पाकच्या मलालाची नोबेलसाठी शिफारस

Last Updated: Saturday, February 2, 2013, 20:30

स्त्री शिक्षणाबरोबरच शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या मलाला युसूफजाई हिच्यावर तालिबानींनी जीवघेणा हल्ला केला. यातून बचावलेल्या मलाला हिची यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

मलालाला `क्वीन एलिझाबेथ`मधून सुट्टी...

Last Updated: Friday, January 4, 2013, 19:26

पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छोट्या मलाला युसूफजाई हिला अखेर ब्रिटनच्या हॉस्पीटलमधून सुट्टी मिळालीय.

शौर्याच्या प्रतिकाला शौर्य पुरस्कार...

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 22:19

तालिबान्यांच्या विरुद्ध देशाच्या संघर्षाचं प्रतीक बनलेली पाकिस्तानी युवती मलाला युसूफजई हिला साहसी वृत्ती तसंच तिनं स्वातच्या खोऱ्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही महिलांच्या शिक्षणाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

‘मलालाला मिळावा नोबेल पुरस्कार’

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:23

पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिला नोबेल शांति पुरस्कारासाठी नामांकन मिळावं, यासाठी अमेरिकेत एक ऑनलाईन अभियान सुरू झालंय.

संयुक्त राष्ट्राचा `मलाला दिन`...

Last Updated: Saturday, November 10, 2012, 15:42

संयुक्त राष्टांनी पाकिस्तानी युवती आणि मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस ‘मलाला दिवस’ म्हणून साजरा केलाय

मलालाची प्रकृती स्थिर; तालिबान्यांवर पुन्हा मात

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 19:03

पाकिस्तानची युवा कार्यकर्ता मलाला युसूफजई हिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती ब्रिटनच्या हॉस्पीटलमधील डॉक्टरांकडून देण्यात आलीय.

मलालाचा हल्लेखोर आमच्या ताब्यात द्या- पाकिस्तान

Last Updated: Monday, October 22, 2012, 17:08

चिमुरड्या मलाला युसूफजईवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवादी मुल्ला फजलुल्ला याला आपल्या ताब्यात द्यावं, अशी मागणी पाकिस्ताननं अफगाणिस्तानकडे केलीय.

कहाणी मलालाची...

Last Updated: Monday, October 15, 2012, 22:47

तालिबान्यांनी केलेल्या जिवघेण्या हल्ल्यात १४ वर्षाची मलाला युसुफजई गंभीर जखमी झालीय. आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. उपचारासाठी तिला थेट इंग्लडला हलविण्यात आलंय. या चिमुरडीसाठी आज सगळं जग प्रार्थना करतंय. पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातल्या या लहान मुलीसाठी अवघ्या जगाला घोर लागलाय...

१४ वर्षीय विद्यार्थींनीवर तालिबानी हल्ला

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 16:26

शांततेसाठी लढा देणाऱ्या एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर तालिबानी दहशतवाद्यांनी आज गोळीबार केला. दरम्यान, मलाला हिच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. तिला राष्ट्रीय शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.