हा व्हिडीओ प्रत्येक मुंबईकरासाठी

Last Updated: Sunday, May 4, 2014, 11:00

क्लीन इंडियन या ग्रुपनं या समस्येवर एक उपाय काढलाय आणि तो व्हिडीओ यू-ट्यूबवर टाकलाय.

दूध टँकरमध्ये केली आंघोळ, तीन महिने डेअरी प्लांट बंद

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 15:52

चार पदरी पॅकिंगमध्ये असलेले बंद दूध आणि दूधाचे पदार्थ विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या क्वालिटीबाबत विश्वास दाखवता. कारण इतकं चांगलं पॅकिंग केलेलं दूध फिल्टर प्रकियेतून जातं, साफ प्लांटमधून हे दूध आपल्यापर्यंत पोहोचतं. मात्र रशियातील या डेअरी प्लांटमधील व्हिडिओ बघून तुम्हांला तुमच्या आवडत्या दूध कंपनीच्या गुणवत्तेबाबतही संशय निर्माण होईल. परदेशातलं हे दृश्य पाहून आपल्याला असं वाटेल की हा आपल्या आजूबाजूचा डेअर प्लांट तर नाही.

ऑईल टँकरसह दोन गाड्या जळून खाक, आठ ठार

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 09:46

मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या विचित्र अपघातात आठ जण ठार तर १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

व्होल्वो बसला आग, ४५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 15:06

बंगळुरु-हैदराबाद महामार्गावर कोठाकोटा येथे व्होल्वो बसची इंधनाची टाकी फुटल्याने बसला आग लागून ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशमधील महबूबनगर जिल्ह्यात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

खाद्यतेलाचा काळाबाजार, नऊ टँकर जप्त

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:20

कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागानं खाद्यतेलाचा कृत्रिम साठा करणा-या नऊ तेल टॅँकरवर कारवाई केली आहे. १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे हे खाद्यतेल असून दिवाळीसाठी या खाद्य तेलाचा कृत्रिम साठा केला असण्याची शक्यता पुरवठा विभागानं व्यक्त केलीय.

सिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!

Last Updated: Monday, October 7, 2013, 20:58

ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.

खाजगी टँकर्सचालकांकडून नाशिककरांची लूट

Last Updated: Thursday, May 2, 2013, 17:05

दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.

आज ‘ईस्टर्न एक्सप्रेस हाय-वे’नं प्रवास टाळा...

Last Updated: Monday, March 4, 2013, 08:17

गॅस टँकर उलटल्यानं झालेल्या अपघातमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळं ज्या प्रवाशांना ईस्टर्न हायवेनं प्रवास करायचा आहे त्यांना आज विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

फ्लायओव्हरवरून गॅसनं भरलेला टँकर उलटला; भीषण आग

Last Updated: Monday, March 4, 2013, 07:37

सोमवारी पहाटे फ्लायओव्हरवरून गॅसचा टँकर कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातानंतर टँकरनं पेट घेतल्यानं या अपघातानं रस्त्यावरच आगीचं रुद्र रुप धारण केलंय.

टँकर-पोलीस व्हॅनमध्ये अपघात, ३२ पोलीस जखमी

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 09:38

इतरांना सुरक्षा पुरविणारे पोलीसच असुरक्षित असल्याचं आज दिसून आलंय. सोमवारी रात्री उशीरा पोलीस व्हॅन आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात ३२ पोलीस जखमी झालेत.

दुष्काळाने घेतला लहानग्याचा बळी

Last Updated: Monday, December 31, 2012, 20:51

दुष्काळानं परिसीमा गाठली आहे. दुष्काळ आता थेट जीवावरच उठलाय. औरंगाबाद जिल्ह्यात लाडसावंगी गावात दुष्काळानं एका 13 वर्षीय मुलाचा बळी घेतलाय.

पिंपरीत टँकर माफिया सक्रिय

Last Updated: Thursday, April 26, 2012, 22:51

पाणी टंचाईची गंभीर समस्या भेडसावत असतानाच लोकांच्या असहाय्यतेचा फायदा उचलत पिंपरीत टँकर माफिया सक्रिय झालाय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचंच या माफियाला अभय असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र टॅन्कर माफियांकडून होत असलेल्या लुटीमुळे नागरिक हैराण झालेत.

पाण्याची तहान ठरली जीवघेणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 18:13

वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

मुख्यमंत्र्यांच्या गावी 'टँकरचं पाणी विहीरीत'

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 08:44

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दुष्काळाने अक्षरश: कहर केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या फलटण, कोरेगाव, खंडाळा आणि माण खटाव या तालुक्यांत सध्या पाण्यासाठी संघर्ष पेटलेला दिसतो आहे. पिण्यासाठी तर सोडाच पण या अवस्थेवर रडण्यासाठीही या ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी शिल्लक नाही.

पुण्यात टँकर माफियांचे थैमान

Last Updated: Thursday, March 22, 2012, 20:59

पुण्यात पाण्याचा काळाबाजार सुरु आहे. शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरमाफिया सक्रीय झालेत. पुणे महापालिकेच्या येरवडा टँकर भरणा केंद्रातून होणा-या पाणीचोरीचा झी 24 तासनं केलेला हा पर्दाफाश.

मुंबई-पुणे महामार्गावर गॅस टँकर उलटला

Last Updated: Sunday, March 18, 2012, 09:33

मुंबई पुणे जुन्या महामार्गावर तळेगाव-दाभाडे इथे गॅस टँकर उलटला. गॅस गळतीने हानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहेत.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकर पलटी

Last Updated: Friday, November 11, 2011, 08:23

मुंबईत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री एक ऑईल टँकर पलटी झाल्यानं अपघात झाला. हा टँकर मुंबईहून नाशिककडे जात होता. टँकर पलटी झाल्यानं रस्त्यावर सर्वत्र तेलाचा तवंग पसरला होता त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. अखेर अग्नीशमन दलानं तेलाच्या तवंगावर माती टाकल्यानं वाहतूक सुरळीत झाली.