धर्मांतराची जबरदस्ती करत पत्नीवर ब्लेडचे १०० वार! Man Brutally Tortures wife for converting to Islam

धर्मांतराची जबरदस्ती करत पत्नीवर ब्लेडचे १०० वार!

धर्मांतराची जबरदस्ती करत पत्नीवर ब्लेडचे १०० वार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईमध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर धर्मांतराची जबरदस्ती करत अनन्वित अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आधी फेसबुकवर मैत्री करून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि नंतर मुलीशी लग्न करून तिला इस्लाम स्वीकारण्याची जबरदस्ती त्याने केली. तिने नकार दिल्यावर तिच्यावर ब्लेडने १०० वार केले. उस्मान अकबर बादशाह असं आरोपीचं नाव आहे. त्याला पाशा या नावाने लोक ओळखतात.

फेब्रुवारीमध्ये शिवडीच्या आदमजी जीवाजी चाळीत राहाणाऱ्या २३ वर्षीय पाशाची फेसबुकवर मुलुंड येथे राहाणार्या एका २१ वर्षीय मुलीशी मैत्री झाली. काही दिवसांतच या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनीही वांद्र्याच्या कोर्टात विवाह केला. लग्नानंतर या मुलीला पाशाने इस्लाम स्वीकारावा यासाठी धमकी द्यायला सुरूवात केली. तिला यासाठी मारहाणही पाशा करत असे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुलीने पाशाच्या धर्मानुसार त्याला घटस्फोट दिला. कायद्यानुसार घटस्फोट अजून दिलेला नाही.

घटस्फोटानंतर पाशाने पुन्हा मुलीशी चांगले संबंध निर्माण करायचा प्रयत्न केला. तसंच तिला पुन्हा घरी येण्याचा आग्रह केला. मात्र मुलीने या गोष्टीला नकार दिला होता. त्यानंतर १७ जूनला पीडित तरूणी मॉलमध्ये जात होती, त्यावेळी तिचं अपहरण करून पाशा तिला आपल्या घरी घेऊन गेला. पुढचे बरेच दिवस तिला घरात ठेवून तिच्यावर अत्याचार केले. तिचा छळ करण्यात आला. पाशाने तिच्या अंगावर ब्लेडने १०० वार केले.

२६ जूनला पीडित तरुणीने पाशाच्या घरातून पळ काढला. मुलुंड येथील पोलीस स्टेशनमध्ये तरुणीने पाशाविरोधात तक्रार नोंदवली. पाशाला अटक करण्यात आली आहे. पाशावर याआधीही १६ खटले दाखल आहेत. तसंच त्याचे वडील १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांमधले आरोपी असल्याचंही पाशाने मान्य केलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 14, 2013, 16:25


comments powered by Disqus