सोनिया, राहुल गांधीही मोदींच्या शपथविधीला राहणार हजर

Last Updated: Saturday, May 24, 2014, 17:01

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. सोमवारी म्हणजेच 26 मेला संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.

अबब! गुजरातमध्ये आहेत १४८ नरेंद्र मोदी

Last Updated: Monday, April 28, 2014, 18:07

संपूर्ण देशभरात चर्चेत असमारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वत:च्या राज्यात तब्बल १४८ नरेंद्र मोदी आहेत. हे मोदी म्हणजे त्यांच्या थ्रीडी कॅम्पेनचा हिस्सा नव्हे तर ते प्रत्यक्षातील नागरिक आहेत.

काँग्रेसच्या घराणेशाहीचा प्रणवदांना फटका - मोदी

Last Updated: Thursday, February 6, 2014, 09:46

इंदिरा गांधींच्या निधनानंतर प्रणव मुखर्जी हेच पंतप्रधान पदाचे खरे दावेदार होते. मात्र, घराणेशाहीमुळे त्यांना संधी मिळाली नसल्याचं सांगत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली.

`राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, पण...`

Last Updated: Thursday, January 16, 2014, 20:13

लोकसभा निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना प्रत्यूत्तर म्हणून काँग्रेसकडून युवराज राहुल गांधींचं नाव पुढे करण्यात येईल, अशी चर्चा गेले कित्येक दिवसांपासून सुरू होती. परंतु, ‘तुर्तास तरी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’ असं आता समजतंय.

राहुलचं काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार - सूत्र

Last Updated: Monday, December 16, 2013, 12:50

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाची लवकरच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

नंदन निलेकणी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 15:25

देशभर आधारकार्ड योजना राबवणारे इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलकेणी यांना काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरविणार असल्याचे वृत्त सध्या दिल्लीच्या राजकारणात येत आहे.

पवारांच्या मनातील पंतप्रधानपदाची इच्छा पुन्हा एकदा उघड

Last Updated: Saturday, November 23, 2013, 23:40

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिलेत.

‘पठानी कुर्त्या’त कसे दिसतील मोदी?

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 15:58

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचं राहणीमान आणि स्वत:ला जनतेसमोर प्रेझेंट करण्याची पद्धती नेहमी अपडेट होत आलीय. आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान हेच मोदी ‘पठानी कुर्त्या’त दिसले तरी आश्चर्य वाटायला नको!

१० रुपये भरून व्हा मोदींच्या रॅलीत सहभागी!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 12:45

एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची दक्षिण भारतात आज पहिल्यांदा रॅली निघणार आहे. या रॅलीत तुम्हालाही सहभागी होण्याची इच्छा असेल तर मात्र तुम्हाला १० रुपये भरावे लागणार आहेत.

सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग, पवारांचा मोदींवर थेट हल्ला

Last Updated: Saturday, September 21, 2013, 18:32

‘पंतप्रधानपदासाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. स्वतःच्या सत्तेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे’ अशी थेट टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केलीय.

अडवाणी आले… पत्र दिलं आणि निघून गेले!

Last Updated: Saturday, September 14, 2013, 09:40

नरेंद्र मोदी यांची भाजपच्या पंतप्रधानपदाचा उमेद्वार म्हणून निवड करण्यात आल्यानं लालकृष्ण अडवाणी यांना समजावण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले.

‘भाजपला आत्ताच दिवाळी साजरी करू द्या…’

Last Updated: Saturday, September 14, 2013, 08:41

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया उमटल्या.

पंतप्रधान उमेदवारीवरुन शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 15:32

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन जेडीयु आणि भाजपमध्ये बिनसलं असतानाच, शिवसेनेनंही यावरुन भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.

‘आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही’

Last Updated: Saturday, April 13, 2013, 15:49

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय. २०१४ च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना पवारांनी ही घोषणा केलीय.

...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना

Last Updated: Thursday, April 11, 2013, 16:16

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचे हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. त्यामुळे मोदींना सेनेचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘राहुलला बनायचंय पंतप्रधान’

Last Updated: Friday, March 29, 2013, 11:57

‘राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचंय पण जर देशातील जनतेनं कौल दिला तरच...’ असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.

एनडीएमध्ये सामिल व्हा आणि पंतप्रधान बना, पवारांना ऑफर

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 17:29

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.