Last Updated: Wednesday, November 2, 2011, 08:52
खड्ड्यांनी साऱ्यांचे जगणं नकोसं केल आहे, दरवर्षी या खड्डयामुळे मोठ्याप्रमाणात गैरसोय होते, त्यामुळे लातुरमध्ये या खड्ड्यांचे काय करयाचे या प्रश्नाने सारेच भंडावले होते. आणि त्यासाठीच भाजपने यासाठी वेगळीच शकल्ल लढवली आहे.लातुरातील प्रभाग क्रमांक १२ मधील रस्त्यांवर खड्डयांची श्रृंखला वाढली आहे. वारंवार पाठपुरावा करुनही त्यांची दुरुस्ती होत नसल्याने शहर भाजपतर्फे या खड्डयांची महापूजा करुन पालिकेचा निषेध नोंदविण्यात आला.