राज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला

Last Updated: Friday, March 1, 2013, 11:42

दुर्दैवाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय उत्तर देणं जमत नाही. त्यांना राजकीय उत्तर देण्याऐवजी रस्त्यांवर उतरून उत्तर देणं ही संस्कृती अधिक योग्य वाटत असावी. माझी अशी अपेक्षा आहे, की महाराष्ट्रातलं राजकारण हे असं व्यक्तींपेक्षा मुद्यांवर तापायला हवं.

राष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?

Last Updated: Sunday, February 24, 2013, 14:56

चक्क शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसविले गेलेत. त्यामुळे शरद पवारांचे ऐकतो कोण? राष्ट्रवादीचे बोटचेपे धोरण. चारा छावणी जनावरांची न राहतात ती माणसांचीच झालीय, हे तेथील दृश्यांवरून दिसून येत आहे. भर उन्हात जनावरांबरोबरच माणसांची फरपट होत आहे. देशाचे कृषीमंत्री यांच्याच मतदार संघात दुष्काळ आहे. त्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही, असे येथे पाहिल्यावर दिसते. पवारांनी एका दिवसाचा पगार दुष्काळांसाठी दिला, तो पुरतो का?

`राज` तुला ठेवू तरी कुठं...

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 07:13

`इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनिंनो...` हे शब्द कानावर पडताच, संपूर्ण मैदानात एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि मराठीची साद घालणाऱ्या नेत्याचा जयजयकार.

निवडणुकीचे `झोलबच्चन`

Last Updated: Thursday, February 21, 2013, 19:07

जबरदस्त ड्रामाबाजी असलेल्या नाटकालाही लाजवेल अशी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक.’सगळे उभे आहेत’ म्हणत नाट्यमय घटनांचा रोज नवा अंक इथे पाहायला मिळाला.

क्रिएटिव्ह जाहिराती, मराठी तरुणांनो राहू नका पाठी!

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 20:53

‘अमुल बटर’च्या एकसे एक जाहिराती बनवणारे, ‘हिंग्लिश’ भाषा लोकप्रिय करणारे, मराठी नाटक, कलाकारांना ग्लोबल लेव्हलला नेणारे आणि भारतानंतर आता टांझानियामध्ये जाहिरात क्षेत्र पादाक्रांत करणारे सुप्रसिद्ध ऍड-गुरू भरत दाभोळकर देत आहेत मराठी तरुणांना जाहिरात क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्याचा कानमंत्र!

काटजूंचे काय करायचे ?

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 16:51

सामान्य आणि सरळसोट विधानांपेक्षा सनसनाटी आणि प्रक्षोभक वक्त्यव्यांना बातमीमूल्य जास्त असते. यावर माध्यमात काम करणा-या सर्वांचेच एकमत असेल. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे या देशातील माध्यमांना नियंत्रित करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्यासारख्या कायदेपंडिताला तर ही बाब अगदी चटकन लक्षात येणे स्वाभाविक आहे.

संरक्षण दलाचा मोठा शत्रू.....घोटाळा

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 12:37

देशाच्या संरक्षण दालपूढे सर्वात मोठे आव्हान कोणाचे असं म्हटलं तर पटकन दोन उत्तरे सहज येतील एक तर चीन किंवा पाकिस्तान. मात्र सध्या संरक्षण दलात होणारे घोटाळे याचेच मोठे आव्हान संरक्षण दलापूढे आहे असं म्हटलं तर ते चुकीचे होणार नाही.

'आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा...

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 15:58

‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ... कुठलाही भव्य जलाशय नसतानाही देहास सचैल स्नान घालणारं आमचं शक्तीपीठ - श्री क्षेत्र आंगणेवाडी...

लसलसणारी पुरुषी लांडगेवृत्ती....

Last Updated: Friday, February 1, 2013, 15:52

‘लगता है छिनाल है साली’.... लोकलच्या पहिल्या वर्गाच्या महिला डब्यात शिरलेली फाटक्या कपड्यातली स्टेशन परिसरात फिरणारी पाच सहा छोटी–छोटी मुलं त्याच डब्यात बसलेल्या माझ्या एका मैत्रिणीकडे बराच वेळ बघत मानखूर्द स्टेशनला उतरली.

स्वत:चं ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून !

Last Updated: Thursday, January 31, 2013, 11:45

अभिनेता शाहरुख खानची पाठराखण करण्यासाठी आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक पुढे सरसावले आहेत.