काँग्रेस पक्षात पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार?

काँग्रेस पक्षात पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार?

Last Updated: Sunday, June 22, 2014, 12:32

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल आणि ए.के.अॅण्टोनी यांनी शरद पवार यांना भेटून ही ऑफर दिली आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय

Last Updated: Saturday, June 21, 2014, 20:39

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय मिळाल्याचं वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेकाच्या गाठीभेटी घेतल्या.

मुख्यमंत्री बदल,काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी सुरुच

Last Updated: Saturday, June 21, 2014, 17:14

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी ए.के.एन्टोनींची भेट घेतलीय. तर महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहतायत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री दिल्लीत पोहचलेत.

रेल्वे भाडेवाढीला अर्थमंत्री अरूण जेटलींचा पाठिंबा

रेल्वे भाडेवाढीला अर्थमंत्री अरूण जेटलींचा पाठिंबा

Last Updated: Saturday, June 21, 2014, 17:07

रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे भाडेवाढीचा कठीण पण योग्य निर्णय घेतला असं म्हणत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज भाडेवाढीच्या निर्णयाला पाठींबा दिला.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुलांना म्हटलं `रिजेक्टेड माल`

Last Updated: Saturday, June 21, 2014, 16:35

राजकारणी लोक एखादं वक्तव्य करण्याआधी अगोदर विचार करतात का? असा प्रश्न निर्माण व्हावा, असं वक्तव्य गुजरातच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केलंय... एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी मुलांना चक्क `रिजेक्टेड माल` असं संबोधलंय.

हर्षिता केजरीवालनं वडिलांच्या पायावर टाकलं पाऊल...

Last Updated: Saturday, June 21, 2014, 14:47

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. 12 वीच्या परीक्षेत चांगले टक्के मिळवल्यानंतर हर्षिताने आयआयटी जेईई ही परीक्षा पास झाली आहे.

घालमेल वाढली; रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरुच

Last Updated: Saturday, June 21, 2014, 11:26

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले.

स्वत:चं घर आणि गाडी घ्यायचीय... थोडं थांबा!

Last Updated: Saturday, June 21, 2014, 10:03

जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

महागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ

महागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ

Last Updated: Friday, June 20, 2014, 19:43

रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.

काम करा नाही तर चालते व्हा- मोदी सरकारचा नवा मंत्र

काम करा नाही तर चालते व्हा- मोदी सरकारचा नवा मंत्र

Last Updated: Friday, June 20, 2014, 15:39

रेल्वेला चालविण्यासाठी पारंपारिक विचार आणि वर्तमान पद्धत पुरेशी नाही. त्यामुळे नवे काहीच हाती लागणार नाही. काही करत नसल्याचे स्पष्टीकरण किंवा कोणतेही कारण आता मोदी सरकार खपवून घेणार नाही. आमच्या सरकारचा मंत्र आहे, काम करा नाही तर चालते व्हा, असे रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी देशभरातील रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.