मुंबई, दिल्ली पुन्हा अतिरेक्याचे टार्गेट, अलर्ट जारी

Last Updated: Friday, June 20, 2014, 13:06

मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरांची रेकी दहशतवाद्यांनी केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखल्याची माहिती एनआयए या संस्थेने दिलेय. तसा इशाराही देण्यात आल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

'आयएसओ 9001' सरकार; ही तर मोदींची इच्छा!

Last Updated: Friday, June 20, 2014, 12:16

जगातील पहिलं ‘आयएसओ 9001’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर स्टॅन्डर्डायजेशन’ सर्टिफाईड सरकार म्हणून भारत सरकारचं नाव समोर यावं, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार

Last Updated: Thursday, June 19, 2014, 22:25

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.

भारतासह आशियातील चार देशांना बर्डफ्लूचा धोका

Last Updated: Thursday, June 19, 2014, 15:27

भारतात पुन्हा बर्डफ्लूचा धोका उद्धभवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. आशियातील पाच देशांना हा धोका पोहोचू शकतो. याबाबत काही तज्ज्ञांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे.

भारतीयांचे अपहरण, नातेवाईक चिंताग्रस्त

Last Updated: Thursday, June 19, 2014, 12:36

इराकमध्ये मोसूल शहरातल्या ४० भारतीय नागरिकांशी भारत सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे इराकमध्ये असलेल्या भारतीयांचे नातेवाईक अतिशय चिंताग्रस्त आहेत.

राज ठाकरेंविरोधात गाझियाबाद कोर्टाचा अजामीनपात्र वॉरंट

राज ठाकरेंविरोधात गाझियाबाद कोर्टाचा अजामीनपात्र वॉरंट

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 22:07

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गाझियाबाद कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. त्यामुळं आता पुन्हाराज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार फिरू लागलीय.

तलाक,तलाक,तलाक विरोधात महिलांची मोहिम

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 21:12

सध्या देशात मुस्लिम महिलांची परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांनी यासाठी मसुदा तयार केला आहे. या मसुद्यात तलाक बोलून दिले जाणारे घटस्फोट, अनेक विवाह आणि मेहरची रक्कम यांवर नवीन कायदे बनवले आहेत.

महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारची साठेबाजांवर करडी नजर

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 19:10

गेल्या पाच महिन्यांतला रेकॉर्ड महागाई दर, मान्सून कमी होण्याची शक्यता आणि इराकमध्ये चिघळत चाललेली परिस्थिती या तीन गोष्टी सामान्यांचं कंबरडं मोडू शकतात. याच पार्श्वभूमीवर महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. याच संदर्भात मोदींनी कॅबिनेटची बैठक घेतली.

ऑनलाईन बॅंकीगला वायरस ग्रहण, भारताचा तिसरा क्रमांक

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 18:13

इंटरनेटचा वापर मोठया प्रमाणात भारतात होतो. त्याचप्रमाणे ऑनलाईन बॅंकीगमध्ये भारत अग्रेसर आहे. परंतु आता ऑनलाईन बॅंकीगमध्ये वायरस आल्याचे समजते.

धर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!

धर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 16:32

उत्तर प्रदेशमध्ये प्रेमासमोर मोठ्या विरोधाचा अखेर पराभव झालाय. धर्माचं बंधन तोडत एका प्रेमीयुगुलाचा निकाह चक्क मंदिरात झाला. या विवाहाला काजी साहेबांसोबत दोन्ही तरुणांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ट उपस्थित होते.