मोदींनाच भेटलो कुणा पाकिस्तानीला नाही; पवारांची कबुली

Last Updated: Monday, February 10, 2014, 09:59

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं खुद्द शरद पवार यांनीच अखेर मान्य केलंय. ठाण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही कबुली दिलीय.

एटीएम हल्ल्यावर आता विमा संरक्षण

एटीएम हल्ल्यावर आता विमा संरक्षण

Last Updated: Sunday, February 9, 2014, 19:15

एटीएममध्ये जर तुमच्यावर हल्ला झाला, तर तुम्हाला आता यावर विमा संरक्षण असणार आहे. एटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांना एटीएमच्या आत हल्ला झाल्यास विमा संरक्षण देण्यावर, बँकाचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तान सांभाळता येत नाही, आणि आणखी काश्मीर हवाय!

पाकिस्तान सांभाळता येत नाही, आणि आणखी काश्मीर हवाय!

Last Updated: Sunday, February 9, 2014, 22:13

पाकिस्तानातली परिस्थिती अतिशय भयानक आहे, पाकिस्तान आर्थिक अडचणींचा सामना करतोय हे, अख्या जगाला माहित आहे. मात्र पहिल्यांदा पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने ही बाब मान्य केली आहे.

पाकिस्तानात जाऊन तर मी कुणाला भेटलो नाही ना? - पवार

पाकिस्तानात जाऊन तर मी कुणाला भेटलो नाही ना? - पवार

Last Updated: Sunday, February 9, 2014, 12:51

मी मुख्यमंत्र्यांना भेटलो ना?, चीन किंवा पाकिस्तानात तर जाऊन कुणाला भेटलो नाही ना?, असा सवाल शरद पवार यांनी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर बोलतांना केला आहे.

नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्ला

नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्ला

Last Updated: Saturday, February 8, 2014, 20:37

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला मोदीनी उत्तर दिलंय. मोदींनीही काँग्रेसचा समाचार घेतलाय. पटेल नसते तर आसाम पाकिस्तानात राहिले असते असं सांगत गुवाहाटीतल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय.

सीबीआय प्रमुखांचं `युपीए`बद्दल खळबळजनक वक्तव्य

Last Updated: Saturday, February 8, 2014, 15:33

केंद्रीय अन्वेषण विभागानं गुरूवारी इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात मानले जाणारेअमित शहा यांच्यावर आरोप केले असते तर युपीए सरकारला आनंद झाला असता, असं खळबळजनक वक्तव्य सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांनी केलंय.

RSS ही विषारी विचारधारा, राहुल गांधींचा घणाघात

Last Updated: Saturday, February 8, 2014, 14:50

आरएसएस ही विषारी विचारधारा आहे... आणि या विचारधारेनंच गांधीजींची हत्या केली, असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींची आज मोदींच्या गुजरातमध्ये बारडोलीत सभा झाली. त्यात ते बोलत होते.

प्रत्येक नग्न छायाचित्र अश्लील नाही- सुप्रिम कोर्ट

Last Updated: Saturday, February 8, 2014, 13:51

प्रकाशनातील महिलेचं प्रत्येक नग्न छायाचित्र हे अश्लील नाही, असा निकाल सुप्रिम कोर्टानं दिलाय. आयपीसीच्या १४६ वर्षांपूर्वीच्या तरतुदींचा अर्थ लावून कोर्टानं हा निकाल दिला. `एखाद्या नग्न किंवा अर्धनग्न छायाचित्रामुळं लैंगिक भावना उत्तेजित झाल्या तरच, ते अश्लील म्हणता येईल,` असं मतही कोर्टानं नोंदविलंय.

आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य

आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य

Last Updated: Friday, February 7, 2014, 23:14

आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या वादग्रस्त विधेयकाचा ठराव आज शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणाचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.

भारतीय चलनात कागदाऐवजी प्लास्टिक नोटा

भारतीय चलनात कागदाऐवजी प्लास्टिक नोटा

Last Updated: Friday, February 7, 2014, 21:41

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १० रूपयांच्या प्लास्टिक नोटा जूननंतर चलनात येणार आहेत. २०१४ च्या उत्तरार्धात या नोटांचे फिल्ड परीक्षण होणार आहे. कोच्ची, म्हैसूर, शिमला, जयपूर, भूवनेश्वर या शहरात प्लास्टिकच्या नोटा सर्वात आधी परीक्षणासाठी चलनात आणल्या जातील.