विलासराव - अशोक चव्हाण यांचे मनोमिलन?

Last Updated: Saturday, March 24, 2012, 18:15

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेट घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील कटुता संपल्याची चर्चा आहे.

आमदार जाधवांचा मनसेला रामराम ?

Last Updated: Friday, March 23, 2012, 12:47

औरंगाबाद जिल्ह्यात मनसेत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. विश्वासात न घेता जिल्हा परिषेत आघाडीला पाठिंबा दिल्यानं आमदार हर्षवर्धन जाधव नाराज आहेत. जाधव हे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा आहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:28

केंद्र सरकारच्या बजेटकडून मोठा अपेक्षाभंग झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आहेत त्या राज्य सरकारच्या बजेटकडून... शिक्षण, उद्योग, व्यापार, शेती आणि अर्थातच सामान्यांच्या नजरा आता राज्य सरकारच्या बजेटकडे लागल्या आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये संधीसाधू राजकारण!

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 21:05

राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं बाजी मारलीय. तर अनेक संधी साधू युती पहायला मिळाल्यात. मनसेनं ठाणे, औरंगाबादेत शिवसेना-भाजप युती धक्का दिलाय.

झेडपीत नवी समीकरणं उदयास

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 20:31

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नवी राजकीय समीकरणे उदयाला आलीत. काँग्रेसला ठिकठीकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं दणका दिलाय.यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दणका दिलाय.

मनसेचा आघाडीला 'पाठिंबा', सेनेला मात्र 'ठेंगा'

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 11:38

औरंगाबाद जिल्हा परिषदेतही मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देणार आहे. एवढच नाही तर आघाडीसोबत सत्तेतही सहभागी होणार आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडं, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडं तर मनसेला दोन समित्या मिळणार आहेत.

सत्तेसाठी गोपीनाथ मुंडेची मनसेला हाक

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 10:14

औरंगाबादमध्ये शिवसेना, भाजप आणि मनसेनं एकत्र यायला हवे, असे आवाहन भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केले आहे. मनसे आणि शिवसेनेनं भविष्यात एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसे हा वेगळा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्यापेक्षा युतीसोबत यावं अशी अपेक्षा मुंडेंनी व्यक्त केली आहे.

अजित पवारांनी मुंडेंना 'करून दाखवलचं'

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 09:53

बीडमध्ये गेवराईचे भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांना फोडून राष्ट्रवादीनं झेडपीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. अमरसिंह पंडीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं बीड झेडपीची सत्ता समीकरणं बदलेलेली आहेत.

अजितदादांचा मुंडेंना आणखी एक 'धक्का'

Last Updated: Monday, March 19, 2012, 18:18

बीड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या गोपीनाथ मुंडेंच्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुंग लावला आहे. गेवराईचे भाजपचे माजी आमदार विजयसिंह पंडित यांना फोडून राष्ट्रवादीनं झेडपीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे.

सुरेश जैन आज होणार कोर्टात हजर

Last Updated: Monday, March 19, 2012, 11:27

जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या आमदार सुरेश जैन यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांची नऊ दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे.