पाच महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 16:18

पाच महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी जाहीर केला आहे. भिवंडी, परभणी, लातूर, मालेगाव आणि चंद्रपूर या महापालिकांसाठी पंधरा एप्रिलला मतदान होणार आहे.

नांदेडला सापत्न वागणूक

Last Updated: Monday, March 12, 2012, 22:10

मराठवाडा रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिलाय. नांदेड महाराष्ट्रात असला तरी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आलय. हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालीये.

मराठवाड्याच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

Last Updated: Monday, March 12, 2012, 10:13

मराठवाडा रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिला आहे. नांदेड महाराष्ट्रात असला तरी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आला आहे. हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मराठवाड्याच्या जनतेच्या माफक अपेक्षा आहेत.

अपहृत माजी नगरसेवक सलिम कुरेशी यांची हत्या

Last Updated: Sunday, March 11, 2012, 16:00

औरंगाबाद महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहम्मद सलिम कुरेशी यांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. कुरेशी यांचे चार मार्च रोजी अपहरण करण्यात आलं होतं.

औरंगाबाद पर्यटनाकडे कोणाडोळा

Last Updated: Saturday, March 10, 2012, 21:58

मराठवाड्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणजे औरंगाबाद. इथं येणा-या पर्यटकांची संख्या जास्त असूनही रेल्वे मार्गाच्या बाबतीत मात्र प्रवाशांच्या पदरी घोर निराशाच पडलीय. मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आहेत. नेत्यांकडे इच्छा आहे पण प्रभावी रेट्याचं टॉनिक नाही त्यामुळे मराठवाडा विभाग अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे.

औरंगाबाद जि.प.त आघाडीचा झेंडा?

Last Updated: Saturday, March 10, 2012, 18:25

औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे१६ तर राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. त्यामुळं केवळ दोन सदस्यांचा आघाडीला पाठिंबा मिळाल्यास त्यांची सत्ता येणार आहे.

औरंगाबादमध्ये आता 'ठाकरे' पॅटर्न

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:21

ठाणे पालिकेत शिवसेनेला बहुमत नसताना विकासाच्या मुद्यावर आणि लोकभावनेचा आदर करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. आता औरंगाबादमध्येही असाच पॅटर्न राबवून जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा फडकवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या दृष्टीने एक पाऊल शिवसेनेने पुढे टाकले आहे. आता मनसे काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

वीट माफियांची वाढती दहशत

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 15:31

वाळूमाफियानंतर आता वीट माफियांची दहशत निर्माण झाली आहे. गौण खनिजाची रॉयल्टी मागण्यास गेलेल्या उस्मानाबादच्या तहसिलदारांना वीटभट्टी चालकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

संपावर बस, पालक-विद्यार्थी 'बे'-बस

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:54

राज्यभरातील बस मालक ९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातल्या बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यात आहे. बस मालक संघटनेच्या सदस्यांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली.

रितेश-जेनेलियाचं देवदर्शन, तुळजापुरात 'गोंधळ'!

Last Updated: Monday, March 5, 2012, 17:15

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात जागरण गोंधळ विधी केले. त्यांची मुलं रितेश आणि धीरज या दोघांचे विवाह नुकतेच पार पडले.