नांदेड अपघातात ११ ठार, १६ जखमी

Last Updated: Saturday, April 14, 2012, 15:20

नांदेड वसमत मार्गावर प्रवासी वाहतूक करणा-या टाटा मॅजिक व्हॅन आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झालाय तर १६ जण जखमी झालेत. काल संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात घडला.

वर्ध्यात प्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा

Last Updated: Saturday, April 14, 2012, 14:07

वर्धा जिल्ह्यातील आंजी गावात अनुसुया माता मंदिरातमहाप्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा झालीय. वार्षिक कार्यक्रमाच्या निमीत्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेवणातील बासुंदी मधून विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांची स्थिती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मुंबईत मेगाब्लॉक, मनमाड मार्गावर लाईनब्लॉक

Last Updated: Saturday, April 14, 2012, 15:31

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्टेशनदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर दुरुस्तीचे काम चालणार आहे. तर मनमाड-नांदेड मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २.३0 ते ६.३0 या वेळेत चिकलठाणा ते करमाडदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येईल.

पवारांनी विलासरावांना केलं टार्गेट

Last Updated: Friday, April 13, 2012, 16:43

लातूर महानगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलासरावांना टार्गेट करत चांगलीच टीका केलीये. एकेकाळी लातूर पॅटर्नमुळे गाजणारं लातूर आता घोटाळ्यांमुळे बदनाम होऊ लागल्याची टीका करत त्यांनी विलासरावांवर नाव न घेता टीका केली आहे.

बिहार दिन साजरा करून दाखवाच - राज

Last Updated: Thursday, April 12, 2012, 21:43

बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?

बलात्कारामुळे १२ वर्षाची मुलगी कुमारी माता

Last Updated: Thursday, April 12, 2012, 18:13

उस्मानाबादमध्ये माणूसकिला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. उस्मानाबादमध्ये १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. आणि त्यामुळे पीडित मुलगी ही माता झाली आहे.

अजित पवारांच्या सभेतच 'बत्ती गुल'

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 21:48

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या सभेतच बत्ती गुल झाल्याची घटना परभणीत घडली आहे. परभणी मनपा निवडणूक प्रचारासाठी अजित पवारांची सभा योजित करण्यात आली होती.

मद्यपी ड्रायव्हरचा हैदोस १५ जणांना उडविले

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 19:49

औरंगाबादमध्ये एका मद्यपी ड्रायव्हरने १० ते १५ जणांना उडवले आहे. औरंगाबादच्या पैठणगेट ते गुलमंडी भागातली घटना दारुच्या नशेत औरंगाबादमध्ये ड्रायव्हरचा हा हैदोस सुरू होता. त्यामुळे या भागातील वातावरण काही काळ चिंताजनक झालं होतं.

मुलगा विकत न दिल्यामुळे मुलाचाच खून

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 11:40

औरंगाबादमधील वैजापूर शहरात मुलगा विकत न दिल्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय रोहित भारस्करला विकत न दिल्यामुळे दोघांनी त्याचा धारदार शस्त्रानं पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली.

प्रचारात राज्यपाल, आचारसंहितेचा भंग?

Last Updated: Monday, April 9, 2012, 15:20

लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं राज्यपाल असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा फोटो प्रचारासाठीच्या पोस्टरवर वापरला आहे. आचारसंहितेचा भंग केला असल्यानं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे.