देशमुखांनी केली आचारसंहिता भंग?

Last Updated: Thursday, April 5, 2012, 13:05

लातूर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना विलासराव देशमुख यांचे पूत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चानं केला आहे.

'उद्यान' तसं चांगलं, पण सध्या वेशीवर टागलं

Last Updated: Thursday, April 5, 2012, 07:54

पैठणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाला सध्या महसूल विभागानं टाळं ठोकलं आहे. उद्यानाच्या कंत्राटदारानं महसूल विभागाचा जवळपास सव्वा कोटींचा मनोरंजन कर थकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर हे उद्यान बंद असून उद्यानातील वृक्ष संपती आता धोक्यात आलीय.

विधानसभा कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 12:09

विधानसभेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या कारणावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

हर्षवर्धन अखेर 'मनसेत'च राहाणार

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 10:07

औरंगाबादमधील कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव मनसेत राहणार की शिवसेनेत जाणार या वादावर सध्यातरी पडदा पडला आहे. आपण मनसेतच राहणार असल्याचं खुद्द हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलंय.

हर्षवर्धन जाधव मनसेला जय महाराष्ट्र करणार?

Last Updated: Monday, April 2, 2012, 14:17

हर्षवर्धन पाटील मनसेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे. जाधव आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हर्षवर्धन जाधव मनसेच्या तिकिटावर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून निवडून आले आहेत.

उस्मानाबादमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची आत्महत्या

Last Updated: Sunday, April 1, 2012, 14:18

उस्मानाबादमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यानं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यानं ही आत्महत्या केली आहे. रस्त्याचं रखडलेलं काम पूर्ण करण्यात यावं अशी त्याची मागणी होती.

राज्यभरात रामनवमीचा उत्साह...

Last Updated: Sunday, April 1, 2012, 11:07

रामनवमीनिमित्त राज्यभरात भाविकांचा उत्साह दिसून येतोय. शिर्डी, नाशिकसह अनेक ठिकाणी आज रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

शिर्डीच्या नव्या ट्रस्टला स्थगिती

Last Updated: Friday, March 30, 2012, 16:21

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिलीय. औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीसंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश 2010 मध्ये दिले होते.

लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं- बाळासाहेब

Last Updated: Thursday, March 29, 2012, 17:34

देशाकडे पुरेशी शस्त्र नाहीत असं पत्र लिहून लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं, अशा शब्दांत बाळासाहेबांनी या वादावर नाराजी व्यक्त केली.... लष्करप्रमुखांनी पत्र लिहिण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून हे सांगायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडलं.

विधान परिषदेत बोगस प्रश्नांची मालिका उघड

Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:16

विधान परिषदेत बोगस प्रश्नांची मालिका उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोगस प्रश्नांच्या मालिकेमागे कोणाचा हात आहे? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.