'आठवण' - संगम नव्या जुन्याचा

Last Updated: Sunday, May 13, 2012, 17:35

एक ऐतिहासिक शहर म्हणून कल्याण शहराची ओळख आहे. या शहराच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींवर आधारीत ‘आठवण भाग एक’ ही डॉक्युमेंट्री प्रकाशित करण्यात आली. लेखक-दिग्दर्शक समीर लिमये यांनी ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे.

आंबा, मासे नाही, कोकणचं काही खरं नाही

Last Updated: Sunday, May 13, 2012, 15:46

कोकणात मासे खाण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर सावधान, गेल्या काही दिवसांपासून मासेच मिळत नसल्यानं, कोकणात मासे महागले आहेत.. याचा फटका पर्यटकांनाही सहन करावा लागतो आहे.

हॉस्पिटलने नाकारले, महिलेची प्रसुती ट्रेनमध्येच

Last Updated: Sunday, May 13, 2012, 13:04

केडीएमसीच्या गलथन कारभाराचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. डिलीव्हरीसाठी पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या महिलेला सायन हॉस्पटलमध्ये पाठवण्याचा सल्ला दिला गेला.

वसई किल्ला जिंकला... विजयोत्सव साजरा करू

Last Updated: Sunday, May 13, 2012, 10:43

वसई विरार महापालिकेकडून दोन दिवसांच्या विजयोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. चिमाजी आप्पांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातून विसई किल्ला जिंकल्याच्या घटनेला २७४ वर्ष झाल्यानिमित्त याचं आयोजन करण्यात आलं आहे.

कोंडाणे धरणाच्या कामावर हायकोर्टाचे ताशेरे

Last Updated: Saturday, May 12, 2012, 22:38

कोंडाणे धरणाच्या कामाबाबत उच्च न्यायालयानं सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. सरकारी खातं आणि ठेकेदारांमधील साटंलोटं यामुळे धरणाचा खर्च कोट्यवधी रुपयांनी वाढलाय. कोर्टानं सध्या कामाला स्थगिती दिलीय आणि पाच आठवड्यात प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत.

ठाकरेंचा इनकम सोर्स काय? – राणे

Last Updated: Saturday, May 12, 2012, 11:38

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या टक्केवारीवर जगत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचा इनकम सोर्स काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दुष्काळग्रस्तांना नवी मुंबईत मदतीचा हात

Last Updated: Friday, May 11, 2012, 16:21

नवी मुंबईत स्थलांतर झालेल्या दुष्काळग्रस्तांना राजकीय पक्षांनी मदतीचा हात पुढं केलाय. त्यांना अन्नधान्यांबरोबरच औषधांचीही मदत केलीय. तसंच येथून पुढंही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचं राजकीय पक्षांकडून सांगण्यात आले आहे.

दुसऱ्याची तहान भागवणारे टंचाईत

Last Updated: Friday, May 11, 2012, 16:22

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका ही शहापूर तालुक्याची ओळख...मात्र मुंबईची तहान भागवणा-या याच तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

कोकण स्था.स्व. संस्थेसाठी विरोधक आक्रमक

Last Updated: Thursday, May 10, 2012, 19:27

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सत्तारुढ आघाडी विरोधात एकच उमेदवार देण्याच्या विरोधकांच्या हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादीने अनिल तटकरे यांना उमेदवारी दिलीय.

मुरबाडी नदी प्रदुषित

Last Updated: Thursday, May 10, 2012, 19:16

मुरबाड तालुक्यातल्या अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्याचवेळी मुरबाडकरांचा हक्काचा पाण्याचा स्त्रोत म्हणजे मुरबाडी नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झालीय.