शहिदाच्या मात्या-पित्याची वणवण

Last Updated: Friday, May 18, 2012, 16:24

एकुलता एक मुलगा शहीद झाला, तेव्हा वीरमरण आलेल्या मुलाचं स्मारक बांधण्यापासून घरापर्यंत पक्का रस्ता बांधण्याची मोठ-मोठी आश्वासनं नेत्यांकडून देण्यात आली. प्रत्यक्षात वृद्ध माता-पित्यांना घरी जाण्यासाठी पायवाटही उरलेली नाही.

संस्था- बिल्डर्सच्या वादात खडसेंची उडी

Last Updated: Friday, May 18, 2012, 13:48

ठाण्यातील श्रीष गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. या वादात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आग्रहावरुन मुख्यमंत्र्यांनी पुनर्बाँधणीच्या कामाला स्थगिती आदेश दिलाय.

कल्याणात पोलीस कर्मचा-याला मारहाण

Last Updated: Friday, May 18, 2012, 10:01

काही दिवसांपूर्वी भिवंडीतील एका वाहतूक पोलीस कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमधे गुरूवारी तीन मद्यपी युवकांनी कल्याण सुभाष चौक परिसरातील ऑन ड्यूटी उपस्थित ट्राफिक पोलीस कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

शेजारी धरण, तरी पाण्यासाठी वणवण

Last Updated: Friday, May 18, 2012, 08:37

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागत आहेत. त्या भागातल्या नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे त्याच्या आसपासच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.

गुहागरमध्ये सात कुटुंब वाळीत

Last Updated: Thursday, May 17, 2012, 13:56

गुहागर तालुक्यातील तांबडवाडी इथं राहणारी सात कुटुंबं आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून गाव पुढा-यांनी त्यांना वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

रायगडात कागदी धरण, खर्च १०० कोटी

Last Updated: Thursday, May 17, 2012, 09:16

रायगड जिल्ह्यातली सिंचनाच्या गौडबंगालाची एक कथा आहे... यामध्ये 100 कोटी रुपयांच्या धरणात एकही थेंब पाणी साठलेलं नाही.

अंबरनाथमध्ये मनसे पॅटर्न संपुष्टात

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 16:59

अंबरनाथमध्ये आज मनसे पॅटर्न संपुष्टात आलाय. सेनेला कामाच्या मुद्यावर पाठींबा देणाऱ्या मनसेच्या ६ नगर सेवकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला सभापती निवडणुकीत पाठिबा दिला. त्यामुळे आत्ता आघाडीचे २६ तर युतीचे आणि अपक्ष मिळून २४ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे.

झी २४ तासमुळे डेंगनमाळमध्ये पाणी!

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 16:14

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील डेंगनमाळसह इतर गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. डेंगनमाळमधील पाण्याच्या प्रश्नाची व्यथा झी 24 तासनं प्रथम मांडली होती. त्यानंतर जाग आलेल्या सरकारनं 5000 लीटरच्या पाण्याच्या दोन टाक्या गावात बसवल्यात.

ठाण्यात अंध, अपंगांना ठेंगा

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 10:50

ठाण्यात यापुढे अंध आणि अपंगांना फूटपाथवर स्टॉल मिळणार नाहीत. तसा निर्णय महापालिकेच्या येत्या १९ तारखेला होणा-या बैठकीत घेतला जाणार आहे. फूटपाथवर स्टॉलची संख्या वाढू नये यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे.

पानिपत : न उलगडलेल्या घटनांवर प्रकाश

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 10:50

ठाण्याच्या संजय क्षीरसागर या तरुणानं पानिपतच्या युद्धावर संदर्भग्रंथ लिहिलाय. यामध्ये पानिपतच्या आजपर्यंतच्या न उलगडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आलाय. विशेष म्हणजे दोन्ही पाय निकामी झालेले असतानाही संजय क्षीरसागरनं ही किमया केलीय.काय आहे रिपोर्ट.