मनसे-भाजपवर मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल

Last Updated: Thursday, April 3, 2014, 08:42

भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनी जोरदार टीका करताना दोघांची औकात दाखवून दया, अशी मतदारांना साद घालताना राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

चिपळूण-संगमेश्वरमध्ये भूकंप, कोकण रेल्वेला फटका

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 11:53

चिलीमध्ये ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असतानाच कोकणातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. चिपळूण, संगमेश्वर, कोयना, पाटण परिसरात भूकंप झाला. तर चिपळूण आणि उक्षी या कोकण रेल्वेच्या स्टेशन दरम्यान धक्के बसल्याने तीन एक्सप्रेस गाड्या थांबविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला.

कोकण रेल्वेचा प्रवास आता कूल कूल

कोकण रेल्वेचा प्रवास आता कूल कूल

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 10:27

कोकण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे. गर्दी आणि उन्हाळा यापासून सुटका होण्यासाठी आता कोकण रेल्वेने जादा डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेही एसी डबे जोडण्यात येणार आहेत. दादर-मडगाव-दादर जनशताब्दीला तीन तर दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणीला दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 11:42

कल्याणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या डोंबिवली एमआयडीसीतल्या ऑफिससमोर राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटताना ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. या कार्यकर्त्यांकडून १ लाख २१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केलीय.

कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळा, नाहीतर कारवाई - उद्य सामंत

कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळा, नाहीतर कारवाई - उद्य सामंत

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 09:38

सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी कारवाईचा बडगा उगारेल, असा इशारा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत दिलाय.

उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जादा गाड्या

Last Updated: Saturday, March 29, 2014, 16:56

उन्हाळी सुट्टया लागल्या की, चाकरमानी आणि पर्यटक यांची गर्दी कोकणाकडे वळते. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता मध्य रेल्वेने दादर ते सावंतवाडी अशा एकूण ५२ विशेष गाड्या सोडणार येत असल्याचे सांगितलंय. तसेच या विशेष गाड्या आठवड्यात तीन वेळेस धावतील.

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भरला `दम`

Last Updated: Saturday, March 29, 2014, 14:36

तुमचा गावित करण्याची वेळ आणू नका, अशी दमबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना खडसावले. अधिकृत उमेदवाराचे काम करा, असे सातत्याने सांगूनही काहीजण ऐकत नाहीत. त्यांना आता शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे, असे अजित पवार म्हणालेत.

राणे-राऊत कलगितूरा, कोकण विकास मुद्दा बाजुला

राणे-राऊत कलगितूरा, कोकण विकास मुद्दा बाजुला

Last Updated: Saturday, March 29, 2014, 12:38

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा पार्ट टू रंगू लागलाय. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत दहावी नापास असल्याचा आरोप करणाऱ्या राणे कुटुंबाला राऊत यांनी थेट एमएची पदवी दाखवत चोख उत्तर दिलंय. सध्या तरी कोकणातलं राजकारण विकासाचे मुद्दे सोडून नको तिकडे भरकटलंय.

कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन

कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन

Last Updated: Thursday, March 27, 2014, 15:44

गुढी पाडवानिमित्ताने कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर आहे. या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावेल.

राणेंना मदत न करण्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम

राणेंना मदत न करण्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम

Last Updated: Thursday, March 27, 2014, 09:09

सिंधुदुर्गात नारायण राणेंना मदत करणार नसाल तर खड्यासारखे बाजूला करू असा इशारा उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला होता. तरीही कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीत. वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ पण राणेंना मदत करणार नाही असा पवित्रा त्यांनी आता घेतलाय. सामंतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळलीय.