सिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे

सिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 10:23

कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.

राणेंच्या इशाऱ्यानंतर दीपक केसरकरांच्या सुरक्षेत वाढ

राणेंच्या इशाऱ्यानंतर दीपक केसरकरांच्या सुरक्षेत वाढ

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 13:38

रत्नागिरी-सिंधुदुर्गात दीपक केसरकर-नारायण राणे वादानंतर केसरकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. रेल्वे सुरक्षा बलातील आठ रायफलधारी पोलीस केसरकरांसाठी तैनात करण्यात आलेत.

उद्धव ठाकरेंचं बेडूक झालंय - राणे

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 08:56

एकेकाळचे शिवसैनिक आणि सद्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चक्क `बेडूक` म्हणून हिणवलंय.

कोकण रेल्वेची वाहतूक सुरू...

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 08:40

तब्बल वीस तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झालीय. मालगाडीचे डबे काढण्याचे काम पूर्ण झाले असून मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना करण्यात आलीय.

निलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर

निलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर

Last Updated: Monday, April 14, 2014, 19:02

रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.

मालगाडीचे ४ डबे घसरल्यानं कोकण रेल्वे ठप्प

मालगाडीचे ४ डबे घसरल्यानं कोकण रेल्वे ठप्प

Last Updated: Monday, April 14, 2014, 12:35

कोकण रेल्वेवर मालगाडीचे चार डब्बे घसरल्यामुळे वाहतूक ठप्प झालीय. आज सकाळी उक्शी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडलीय. दरम्यान, मालगाडीचे डबे रुळावरून हटवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या कामासाठी आठ ते दहा तास लागणार असल्याने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी

दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी

Last Updated: Sunday, April 13, 2014, 13:40

कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.

विकासाचं सोंग आणून आघाडीचे मंत्री लाटतात जमिनी

विकासाचं सोंग आणून आघाडीचे मंत्री लाटतात जमिनी

Last Updated: Sunday, April 13, 2014, 12:26

काँग्रेस आघाडीतले मंत्री हे नुसतेच गब्बर नाहीत, तर योजनाबद्धरित्या यांनी महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. त्या जमिनी लाटताना योजना आखून पद्धतशीरपणे लाटल्या आहेत. आधी स्वतःसाठी जमिनी शोधतात त्या विकत घेतात आणि नंतर सरकारी तिजोरीतून त्या जागेवर प्रकल्प मंजूर करून विकासाचा सोंग आणतात, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी महाड इथल्या सभेत केली आहे.

कोकणात आज ठाकरे- पवार आमने सामने

कोकणात आज ठाकरे- पवार आमने सामने

Last Updated: Sunday, April 13, 2014, 08:51

आजचा दिवस कोकणासाठी झंजावाती असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज कोकणात सभा होताहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली आणि रत्नागिरीत जाहीर सभा होतीये.

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत राडा, आघाडीच्या बैठकीत कानाखाली

Last Updated: Saturday, April 12, 2014, 16:57

कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये प्रचंड रा़डा सुरू आहे. सिंधुदुर्गमधील वाद क्षमण्याची चिन्हे नसतानाच रत्नागिरीच्या काँग्रेस भवनात जोरदार राडा झाला. आघाडीच्या बैठकीत हा राडा झाल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणूक जड जाण्याचे संकेत मिळत आहेत.